Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विश्वराज हॉस्पिटलसमोरून पोलिसाची कार पळवली; कारने ॲक्टिव्हाला दिली धडक, मद्यधुंद चालक ताब्यात

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 12 June 2026, 12:30

लोणी काळभोर, ता. १२ : विश्वराज हॉस्पिटलसमोर उभी असलेली एका पोलीस कर्मचाऱ्याची कार परवानगीशिवाय घेऊन जात मद्यधुंद अवस्थेतील युवकाने भरधाव वेगात अॅक्टिव्हाला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील समता नगर परिसरात गुरुवारी (ता. 11) दुपारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कार आणि अॅक्टिव्हाचे मोठे नुकसान झाले असून लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार तौसीफ रसुल सय्यद यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर शिवाजी सावंत (वय ३०, रा. समतानगर, कदमवाकवस्ती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार तौसीफ सय्यद हे त्यांच्या आई-वडिलांच्या औषधांसाठी पुण्यात गेले होते. औषधे घेतल्यानंतर ते दुपारी साडेतीनच्या सुमारास लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल परिसरात आले. त्यांनी त्यांची मारुती स्विफ्ट डिझायर (एमएच १२ टीके १३८१) ही कार राजधानी बेकरीसमोर उभी केली.

यावेळी कारची चावी गाडीतच राहिली होती. बेकरीत जाण्यापूर्वी त्यांची भेट हॉस्पिटलमधील सुरक्षा पर्यवेक्षक यादव उसपुलवार यांच्याशी झाली. त्याचवेळी एक इसम कार घेऊन जाताना दिसला. सुरक्षा पर्यवेक्षकाने तो आपल्याला परिचित असून कार हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावत असल्याचे सांगितल्याने सय्यद यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.मात्र काही वेळानंतर कार पार्किंगमध्ये दिसून न आल्याने शोधाशोध सुरू करण्यात आली.

 

चौकशीअंती कार घेऊन जाणारा इसम सागर सावंत असल्याचे समोर आले. त्याचा शोध घेत असताना कदमवाकवस्ती येथील पाण्याच्या टाकीजवळ नागरिकांची गर्दी दिसली. तेथे जाऊन पाहिले असता सागर सावंत याने कार भरधाव चालवत उभी असलेल्या अॅक्टिव्हा (एमएच १२ पीबी ११८९) ला जोरदार धडक दिल्याचे आढळून आले. ही अॅक्टिव्हा गणेश जालिंदर डोळसे यांच्या मालकीची असून ती घरासमोर उभी करण्यात आली होती. धडकेत अॅक्टिव्हाचे मोठे नुकसान झाले, तसेच कारचेही नुकसान झाले. घटनास्थळी सागर सावंत याच्या तोंडाला मद्याचा वास येत असल्याने तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी तत्काळ ११२ वर फोन करून पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. परवानगीशिवाय कार घेऊन जाणे, निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवणे व वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05
Next Post

कोलवडी येथे 'काही पैसे रोख आणि उरलेले ऑनलाईन देतो' म्हणणे पडले महागात; हॉटेल चालकाची ग्राहकाला काठीने बेदम मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.