राहुलकुमार अवचट
यवत : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बोरीपार्धी गावच्या हद्दीतील चौफुला येथे अश्लिल हावभाव करणाऱ्या ५ महिलांवर यवत पोलिसांनी कारवाई करून अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोरीपार्धी गावच्या हद्दीतील चौफुला येथील चौकात ५ महिला पुरुषांना अश्लिल हावभाव करुन शारीरिक संबंधाकरिता उत्तेजित करत असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, चौफुला चौकातील बसथांब्याजवळ काही महिला शरीर प्रदर्शन आणि अश्लिल हावभाव करुन येणाऱ्या-जाणाऱ्या पुरुषांशी लगट करुन उत्तेजित करत असल्याचे आढळून आले. या प्रकाराचा तपास करून पाच महिलांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण संपांगे, पो.ना. विकास कापरे, पो. कॉ. सागर क्षिरसागर, महिला पोलीस कॉन्सटेबल सोनाली सुर्यवंशी यांचे पथकाने केली आहे.