Pachagani News : पाचगणी : देशप्रेमाने प्रेरित होऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महान स्वातंत्र्य सैनिक, देशभक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त करून क्रांतिकारांच्या देशभक्तीचा वारसा सर्वांनी पुढे चालू ठेवावा असे मत भाजपचे महाबळेश्वर तालुका प्रभारी अनिल (नाना) भिलारे यांनी व्यक्त केले. (Pachagani News)
देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू..
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत क्रांती दिनाचे औचित्य साधून भिलार येथील स्वातंत्र्य सेनानी कै. भि.दा. भिलारे गुरुजी यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे,सुनिता शशिकांत भिलारे, जावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते. (Pachagani News)
यावेळी उपस्थितांनी हातात दिवे पेटवून भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसीत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू,देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू,भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणा-यांप्रती सन्मान बाळगू तसेच देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू” अशी शपथ घेतली. (Pachagani News)
दरम्यान, ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून अनिल भिलारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कासवंड येथील माजी सैनिक कॅप्टन दिलीप पवार, खिंगर येथील प्रशांत दुधाने, रुईघर येथील सुधीर बेलोशे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सन्मान केला. (Pachagani News)
यावेळी महाबळेश्वर सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी विक्री संस्थेचे चेअरमन किसनशेठ भिलारे, समन्वयक वैशाली भिलारे, ग्रामसेवक राजेंद्र चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.