Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : पॉलिटेक्निक कॉलेज आणि गुगळे हायस्कुल येथे महिला सशक्तिकरण व स्वसंरक्षण मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 10 August 2023, 15:05

Nagar News : अहमदनगर : मुलींनो तुम्हाला कोणाकडून त्रास होत असेल, कोणी छेड काढत असेल तर तुम्ही फक्त न घाबरता तक्रार करा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, आपले नाव गोपनीय ठेवले जाईल असा विश्‍वास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विद्यार्थिनींना दिला. माळीवाडा येथील गुगळे हायस्कुल व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे आयोजित मुलींसाठी स्वसंरक्षण मार्गदर्शन कार्यशाळेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव बोलत होते. Nagar News

मुलींच्या प्रश्नांना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची उत्तरे

मुलींनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना काही प्रश्न विचारले असता यादव यांनी मुलींना आपुलकीने उत्तरे देऊन स्वसंरक्षण कसे करता येईल, याचे मार्गदर्शन केले. शाळेत जाता-येताना कोणी त्रास देत असेल तर काय करायचे, रिक्षा चालकांसह अन्य कोणी त्रास देत असल्यास काय करावे यासह अनेक प्रश्‍न मुलींनी यादव यांना विचारले. प्रश्‍नांची उत्तरे देत मुलींना कोणी त्रास देत असेल तर त्यांना अजिबात सोडणार नसल्याचे यादव यांनी सांगितले. Nagar News

शिशु संगोपन संस्थेचे उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव रं. धो. कासवा, प्राचार्या कांचन गावडे, पर्यवेक्षक प्रा. संजय शेवाळे, पोलीस कर्मचारी पांढरकर, योगेश खामकर, शिवाजी मोरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकत्तेर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कार्यक्राचे सूत्रसंचानक अशा वरखडे यांनी केले तर आभार प्रा. सुभाष चिंधे यांनी मानले. शासकीय तंत्रनिकेतन येथे झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य. बाळासाहेब कर्डिले, डी.डी.अहिरराव, एस.आर.देशमुख, डॉ. बी सी खरबस, अनिता पाटील, आर जे चव्हाण, ए बी कर्डक, वाय.एम. दांदळे, ए. व्ही शिदोरे, एस.एस. पाटील, डी.के.माने, देवेंद्र पांढरकर आदी उपस्थित होते. Nagar News

 

मुलींनी विचारलेल्या प्रश्नांना पीआय यादव यांची उत्तरे..

 

प्रश्न – रस्त्याने कोणी अडवलं तर काय करावे..?

पीआय यादव – काही वेळा रस्त्याने कोणी अडवले तर तुम्ही भीतीपोटी त्याची तक्रार करत नाही आणि त्यामुळे समोरचा व्यक्ती पुन्हा त्रास देतो. रस्त्यात कोणी अडवणूक करून त्रास दिल्यास आधी आजूबाजूच्या लोकांना जो त्रास देत असेल त्याची माहिती द्या. तात्काळ ११२ डायल करून पोलिसांची मदत मिळवा. घरी गेल्यानंतर आई-वडिलांना याची माहिती देऊ जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्या.

प्रश्न – रिक्षावाल्याने गैरवर्तन केलं तर..?

पीआय यादव – तुम्ही रोज रिक्षाने किंवा शाळेच्या बसने शाळा कॉलेजमध्ये ये-जा करता. शाळेत येत असताना रिक्षा चालकाने किंवा इतर कोणी गैरवर्तन केले तर न घाबरतात त्याची तक्रार आपल्या शिक्षकांकडे आधी करा.

प्रश्न – गुड टच आणि बॅड टच कसा ओळखावा..?

पीआय यादव – आईने प्रेमाने मिठी मारणे, जवळच्या व्यक्तीने शाबासकी देणे म्हणजे गुड टच. तर एखादी व्यक्ती आपल्याला वाईट हेतूने स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. शरीराच्या कोणत्याही भागावरून वारंवार हात फिरवणे म्हणजे बॅड टच अर्थात वाईट स्पर्श. अशा स्पर्शाने आपल्याला भीती वाटते, अस्वस्थ वाटते. आपल्या एखाद्या अवयवाला स्पर्श करून कोणाला सांगू नको असे सांगितले जात असेल तर तो वाईट स्पर्श आहे. असे कोणी केल्यास न घाबरतात तात्काळ आई-वडिलांना याची माहिती द्या. खरंतर निसर्गानेच महिलांना असा टच ओळखण्याची नैसर्गिक कला दिलेली आहे.

प्रश्न – रस्त्याने कोणी पाठलाग केला तर काय करावे..?

पीआय यादव – शाळेत-कॉलेजमध्ये जाताना किंवा येताना कोणी पाठलाग करत असेल असे लक्षात आल्यास ११२ कॉल करून पोलिसांची मदत घ्या, याची माहिती आपल्या शिक्षकांना किंवा घरच्यांना आधी द्या. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करून पाठलाग करणाऱ्याला पोलिसांच्या हवाली करा.

प्रश्न – कोणी आमचे फोटो काढले तर काय करायचे..?

पीआय यादव – काही वेळा त्रास देण्यासाठी टवाळखोर मुलं तुमचे फोटो काढतात. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तुमच्याशी गैरवर्तन करतात. अशावेळी घाबरून न जाता घरी याची माहिती द्या. फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्याची तक्रार तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात द्या. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. Nagar News

प्रश्न – सोशल मीडियावरून कोणी मेसेज पाठवत असल्यास काय करावे?

पीआय यादव – सोशल मीडिया हाताळताना पहिले तर तुम्हीच स्वतःहून काळजी घेतली पाहिजे. जी व्यक्ती ओळखीतील नाही त्याची रिक्वेस्ट एक्सेप्ट करू नका. त्याच्या कोणत्याही मेसेजला उत्तर देऊ नका. एखाद्याने वारंवार मेसेज पाठवल्यास पोलीस ठाण्यात येऊन तक्रार करा. विनाकारण मेसेज करून त्रास देत असल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल होतो. Nagar News

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38
Next Post

Pachagani News : क्रांतिकारांच्या देशभक्तीचा वारसा सर्वांनी पुढे चालू ठेवावा - भाजपचे अनिल भिलारे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.