Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊरच्या ‘समाधान शिबिराला’ भर पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद; शिबिरात जितेंद्र डुडी यांची मोठी घोषणा, पानंद रस्त्यांसाठी मिळणार निधी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 31 July 2026, 21:13

पुणे: हवेली तालुक्यातील थेऊर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेले विशेष समाधान शिबिर भर पावसातही उत्साहात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त आणि महसूल दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती हवेली व अप्पर तहसील कार्यालय हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना थेट उपलब्ध करून देण्यात आला.

कार्यक्रमात आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी हवेली तालुक्यातील काही ठिकाणी नैसर्गिक ओढे आणि नाले बुजविल्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या वस्त्यांमध्ये शिरत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. तसेच नदी प्रदूषणामुळे वाढलेल्या डासांच्या समस्येकडे लक्ष वेधत त्यावर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. शिवरस्ते आणि पानंद रस्त्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल दिन प्रथमच ग्रामीण भागात अभियान स्वरूपात साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. भटके-विमुक्त, आदिवासी आणि वंचित घटकांपर्यंत जातीचे दाखले, विविध प्रमाणपत्रे आणि निवारा योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी महसूल विभाग सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे 1,800 कुटुंबांना घरांचा लाभ देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शिवरस्ते आणि पानंद रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

प्रांताधिकारी यशवंत माने आणि तहसीलदार तृप्ती कोलते यांनी अभियानांतर्गत आतापर्यंत 36 हजार 400 नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आल्याची माहिती दिली. जातीचे दाखले, विविध प्रमाणपत्रे, पानंद रस्त्यांशी संबंधित कामे आणि प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

शिबिरात महसूल विभागाच्या सेवा, विविध दाखल्यांचे वितरण, कृषी योजनांची माहिती, महावितरणाशी संबंधित समस्यांचे निराकरण तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. महसूल दिनानिमित्त हवेली तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महसूल अधिकारी, मंडल अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे महापालिकेच्या तिजोरीत महसूल कमी का आला? समाविष्ट गावांतील कर आकारणीची होणार कसून तपासणी

Friday, 28 August 2026, 17:43

लोणी काळभोर पोलिसांचा अवैध दारू विक्रेत्यांना दणका; कुंजीरवाडीत हातभट्टीसह थेऊरमध्ये देशी-विदेशी दारू जप्त

Friday, 28 August 2026, 17:26

ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश! 2 परदेशी नागरिकांसह 3 जण एएनटीएफच्या जाळ्यात; अंमली पदार्थविक्रीप्रकरणी मोठी कारवाई

Friday, 28 August 2026, 17:17

अनैतिक संबंधातून रक्तरंजित थरार! पुण्यात भरचौकात तरुणावर चाकूने वार, जागीच मृत्यू

Friday, 28 August 2026, 16:22

नागपूरच्या मेयो आणि मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनवर FDA चा मोठा छापा; चारपैकी तब्बल तीन उपहारगृहे विनापरवाना सुरू

Friday, 28 August 2026, 16:10

पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; पतीला मारहाण करत खिशातील पैसे लुटले, प्रियकरासह मामाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Friday, 28 August 2026, 15:56
Next Post

ई-20 पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांचे नुकसान होणार? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची संसदेत मोठी कबुली!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp