Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर पोलिसांचा अवैध दारू विक्रेत्यांना दणका; कुंजीरवाडीत हातभट्टीसह थेऊरमध्ये देशी-विदेशी दारू जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 28 August 2026, 17:26

लोणी काळभोर, ता. 28 : लोणी काळभोर पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात सलग दोन दिवस धडक कारवाई करत कुंजीरवाडी आणि थेऊर परिसरातील दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत कुंजीरवाडी येथे 10 लिटर गावठी हातभट्टीची दारू, तर थेऊर येथील पान टपरीतून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आणि 1 हजार 150 रुपयांची रोकड, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच एका विक्रेत्याने घटनास्थळावरून पळ काढला, तर दुसऱ्या कारवाईत एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्ट रोजी लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना कुंजीरवाडी, जुनी माळवाडी वस्ती, जुन्या कॅनॉलच्या पुढे एका दोन मजली घरासमोर गावठी हातभट्टीची दारू विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना कळविल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक योगेश पैठणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने पंचांसह घटनास्थळी धाव घेतली.

आईसाहेब निवास, माळवाडी वस्ती, कुंजीरवाडी येथे पोलिसांनी पाहणी केली असता दादा विलास सकट हा दोन प्लास्टिकच्या कॅनसह उभा असल्याचे दिसले. पोलिसांची चाहूल लागताच सकट याने अंधाराचा फायदा घेत बोळातून पळ काढला. घटनास्थळी असलेल्या दोन कॅनची तपासणी केली असता त्यामध्ये उग्र वासाची गावठी हातभट्टीची दारू आढळली.

पोलिसांनी 10 लिटर गावठी हातभट्टीची दारू, अंदाजे 2 हजार रुपये किमतीची, जप्त केली. त्यातील नमुना तपासणीसाठी वेगळा काढून उर्वरित दारू जागेवरच नष्ट करण्यात आली. याप्रकरणी दादा विलास सकट याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांचे पथक अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असताना थेऊर फाटा परिसरात एका पान टपरीत अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती 26 ऑगस्ट रोजी मिळाली. पोलिसांनी पंचांसह सोनाई पान शॉप, कांबळे मळा, थेऊर रोड, थेऊर येथे छापा टाकला. त्यावेळी टपरीत ग्राहकांना दारूच्या बाटल्या देऊन पैसे स्वीकारले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
छाप्यात टपरीच्या ड्रॉव्हरमध्ये टँगो पंच देशी दारूच्या 90 मिलीच्या तीन बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीची 180 मिलीची एक बाटली आणि 1 हजार 150 रुपये रोख, असा एकूण 1 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

याप्रकरणी पोलिसांनी चेतन अंकुश घुले (वय 21, रा. पेटकर वस्ती, कुंजीरवाडी) याला ताब्यात घेतले. दारू विक्रीसाठी कोणताही वैध परवाना नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देशी-विदेशी दारू विक्री केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध दारू विक्रीविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी सलग दोन दिवस केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

पुणे महापालिकेच्या तिजोरीत महसूल कमी का आला? समाविष्ट गावांतील कर आकारणीची होणार कसून तपासणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp