Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ई-20 पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांचे नुकसान होणार? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची संसदेत मोठी कबुली!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 31 July 2026, 21:55

पुणे: ई-20 पेट्रोलच्या वापराबाबत केंद्र सरकारने प्रथमच स्पष्ट भूमिका मांडली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात, ई-20 पेट्रोलमुळे काही जुन्या वाहनांमधील विशिष्ट रबरचे भाग आणि गॅस्केट बदलण्याची आवश्यकता भासू शकते, असे नमूद केले आहे. मात्र, यामुळे वाहनाच्या इंजिनवर किंवा एकूण कार्यक्षमतेवर मोठा परिणाम होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गडकरी यांच्या माहितीनुसार, हा परिणाम प्रामुख्याने 2005 ते 2016 या कालावधीत तयार झालेल्या बीएस-3 मानकांच्या वाहनांमध्ये दिसून येऊ शकतो. या वाहनांमधील काही रबरी भाग नियमित सर्व्हिसिंगदरम्यान बदलावे लागू शकतात. मात्र, इंजिनमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

इंडियन ऑइल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांनी ई-20 इंधनावर केलेल्या अभ्यासाचा हवाला देत गडकरी यांनी सांगितले की, वाहनाचे मायलेज केवळ इंधनावर अवलंबून नसते. चालकाची वाहन चालवण्याची पद्धत, रस्त्यांची स्थिती, वाहनाची देखभाल आणि इतर अनेक बाबी मायलेजवर परिणाम करतात. तसेच इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर जगभरात अनेक दशकांपासून होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

ई-20 इंधनामुळे इंधन प्रणालीतील पाईप, ओ-रिंग, रबर सील, फ्युएल होज, गॅस्केट, फ्युएल पंपातील रबरी भाग आणि इंजेक्टर सील यांसारख्या भागांवर परिणाम होऊ शकतो. इथेनॉलच्या दीर्घकालीन संपर्कामुळे जुने रबर कडक होणे, फुगणे किंवा मऊ पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आवश्यकतेनुसार हे भाग बदलावे लागू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, दुचाकींसाठी हे भाग बदलण्याचा खर्च साधारण 500 ते 1,500 रुपये, तर चारचाकींसाठी 2,000 ते 8,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. भाग किती वेळाने बदलावे लागतील यासाठी निश्चित कालावधी नसून, नियमित सर्व्हिसिंगदरम्यान झीज किंवा गळती आढळल्यास ते बदलण्याचा सल्ला दिला जातो. नवीन बीएस-4 आणि त्यानंतरच्या वाहनांमध्ये ई-20 इंधनाशी सुसंगत साहित्याचा वापर झाल्याने अशा समस्यांची शक्यता तुलनेने कमी असल्याचे मानले जाते.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ई-20 पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांचे नुकसान होणार? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची संसदेत मोठी कबुली!

Friday, 31 July 2026, 21:55

थेऊरच्या ‘समाधान शिबिराला’ भर पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद; शिबिरात जितेंद्र डुडी यांची मोठी घोषणा, पानंद रस्त्यांसाठी मिळणार निधी

Friday, 31 July 2026, 21:13

४५ लाखांची लाच स्वीकारताना वन अधिकाऱ्याला रंगेहात अटक; बीडच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ

Friday, 31 July 2026, 20:32

मराठी साहित्यासाठी पैशांचा पाऊस! शंभराव्या साहित्य संमेलनासाठी तब्बल १८ कोटी रुपयांच्या भरघोस निधीची घोषणा

Friday, 31 July 2026, 19:39

शेतकऱ्यांची चिंता मिटली ! कर्जमाफीनंतर मोदी सरकारच आणखीन एक गिफ्ट,लाखों शेतकऱ्यांना फायदा

Friday, 31 July 2026, 19:17

गावातल्याच तरुणासोबत सूत जुळलं अन् बायकोनेच काढला नवऱ्याचा काटा! बॉयफ्रेंडच्या मदतीने प्लॅन आखला अन् निर्दयीपणे…

Friday, 31 July 2026, 18:56
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.