Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मराठी साहित्यासाठी पैशांचा पाऊस! शंभराव्या साहित्य संमेलनासाठी तब्बल १८ कोटी रुपयांच्या भरघोस निधीची घोषणा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 31 July 2026, 19:39

पुणे: पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. यासह साहित्य क्षेत्रातील विविध उपक्रमांसाठी एकूण 18 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उदय सामंत यांनी सांगितले की, शंभराव्या साहित्य संमेलनासाठी पाच कोटी रुपये देण्यात येतील. तसेच या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या 99 नांदी संमेलनांसाठी पाच कोटी रुपये, राज्यातील 13 विद्यापीठांमध्ये होणाऱ्या विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांप्रमाणे सुमारे चार कोटी रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय परदेशात आयोजित होणाऱ्या 12 साहित्य संमेलनांसाठी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून दोन कोटी रुपये उभारले जाणार असून महाराष्ट्र साहित्य परिषदेला एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. पुस्तक दालने आणि इतर साहित्यिक उपक्रमांसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी साहित्याचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा यासाठी राज्य सरकार नवीन उपक्रम राबविणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली. साहित्याच्या अनुवादासाठी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने विशेष अनुवाद समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमार्फत इतर भाषांतील साहित्य मराठीत तसेच मराठी साहित्याचे इतर भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

यावेळी राजकीय घडामोडींवरही उदय सामंत यांनी भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण झाले तरी शिवसेनेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत एकनाथ शिंदे हे महत्त्वाचे नेते असून ते राष्ट्रीय पातळीवर प्रभावीपणे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.

 

यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन तसेच समर्थ युवा फाउंडेशनचे विश्वस्त राजेश पांडे उपस्थित होते.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे महापालिकेच्या तिजोरीत महसूल कमी का आला? समाविष्ट गावांतील कर आकारणीची होणार कसून तपासणी

Friday, 28 August 2026, 17:43

लोणी काळभोर पोलिसांचा अवैध दारू विक्रेत्यांना दणका; कुंजीरवाडीत हातभट्टीसह थेऊरमध्ये देशी-विदेशी दारू जप्त

Friday, 28 August 2026, 17:26

ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश! 2 परदेशी नागरिकांसह 3 जण एएनटीएफच्या जाळ्यात; अंमली पदार्थविक्रीप्रकरणी मोठी कारवाई

Friday, 28 August 2026, 17:17

अनैतिक संबंधातून रक्तरंजित थरार! पुण्यात भरचौकात तरुणावर चाकूने वार, जागीच मृत्यू

Friday, 28 August 2026, 16:22

नागपूरच्या मेयो आणि मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनवर FDA चा मोठा छापा; चारपैकी तब्बल तीन उपहारगृहे विनापरवाना सुरू

Friday, 28 August 2026, 16:10

पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; पतीला मारहाण करत खिशातील पैसे लुटले, प्रियकरासह मामाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Friday, 28 August 2026, 15:56
Next Post

४५ लाखांची लाच स्वीकारताना वन अधिकाऱ्याला रंगेहात अटक; बीडच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp