Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; पतीला मारहाण करत खिशातील पैसे लुटले, प्रियकरासह मामाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 August 2026, 15:56

पुणे : पुण्यात पतीने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहात पकडल्यानंतर उद्भवलेल्या वादातून पतीलाच बेदम मारहाण करून त्याचे पैसे लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकाने तत्परतेने कारवाई करत प्रियकर गणेश अशोक रेड्डी (वय 36) आणि त्याचा मामा राजू तिमय्या राव उर्फ धोत्रे (वय 51, दोघे रा. बोपोडी) या दोघांना अटक केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पेशाने रिक्षाचालक असलेल्या तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, 10 जून 2026 रोजी रात्रीच्या सुमारास लोहगाव विमानतळ परिसरात ते प्रवाशाची वाट पाहत होते. त्यावेळी त्यांची पत्नी प्रियकर गणेश रेड्डीसोबत बुलेटवरून जात असताना त्यांना दिसली. त्यांनी तत्काळ त्यांचा पाठलाग केला आणि फॉरेस्ट पार्क रोडवर रिक्षा आडवी घालून त्यांना थांबवले. पतीने तिथे पत्नीकडे विचारणा केली असता वाद सुरू झाला.

संवादादरम्यान रागाच्या भरात प्रियकर गणेशने फिर्यादीला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच पत्नीनेही पतीला मारहाण केली. त्याच वेळी गणेशचा मामा राजू धोत्रे तेथे पोहोचला आणि त्यानेही फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी झोडपून काढले. या गोंधळाचा फायदा घेत गणेशने तक्रारदाराच्या खिशातील 18,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. जखमी अवस्थेत ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पतीने कौटुंबिक पातळीवर मध्यस्थीचा प्रयत्न केला; मात्र पत्नी परत न आल्याने अखेर 8 ऑगस्ट 2026 रोजी लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

25 ऑगस्ट रोजी खडकी परिसरात गस्त घालत असताना पोलिस अंमलदार अनिकेत भोसले आणि जहांगीर पठाण यांना आरोपी औंध येथील भक्ती प्लाझा अपार्टमेंटजवळ थांबल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी लोहगाव पोलिसांच्या सुपूर्द केले.

 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव, पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदुम, दिग्विजय चौगले व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

थेऊरमध्ये विजेचा शॉक लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

Saturday, 29 August 2026, 19:41

थेऊरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे घेऊन फिरणारा संशयित ताब्यात

Saturday, 29 August 2026, 19:20

युद्धाचा पुन्हा भडका; हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक इमारती उद्ध्वस्त

Saturday, 29 August 2026, 19:08

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून 39 लाखांची मालमत्ता विकली! लोणी काळभोर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार, अनेकांवर गुन्हे दाखल

Saturday, 29 August 2026, 18:43

रेशन कार्डधारकांना धक्का! 18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे रेशन कार्ड होणार रद्द; नेमकं कारण काय?

Saturday, 29 August 2026, 18:18

पुणे-नाशिक महामार्गावर काळाचा घाला! ट्रकखाली दुचाकी चिरडली; बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज

Saturday, 29 August 2026, 17:25
Next Post

नागपूरच्या मेयो आणि मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनवर FDA चा मोठा छापा; चारपैकी तब्बल तीन उपहारगृहे विनापरवाना सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp