लोणीकंद : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरीकांच्या समस्या तक्रारी निवारण करण्यासाठी पोलीस ठाण्यात “तक्रार निवारण दिनाचे” आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी दिली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून पुणे पोलीस आयुक्तालयातील लोणीकंद पोलीस ठाण्यात, येरवडा विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे व लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी नागरीकांच्या समस्या तक्रारी निवारण करण्यासाठी ‘तक्रार निवारण दिनाचे’ आयोजन केले होते.
यावेळी येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया वंजारी, पोलीस उपनिरीक्षक राहूल कोळपे, पोलीस उपनिरीक्षक निलेश घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक मोनिका भदे, पोलीस हवलदार दिपक ठाणगे, बाळासाहेब हराळ, रितेश काळे, निखिल गोपाळे, अशिष लोहार, विठ्ठल केदारी यांच्यासह पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.