लोणी काळभोर : महिलांना सक्षम व बळकट करण्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे द टायग्रिष स्कुलमध्ये ‘महिला व सामाजिक मानसिकता’ या विषयावर सोमवारपासून (ता. 7) सलग 5 दिवसिय परिसंवादेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती स्कायव्हीजन एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर वाघ यांनी दिली आहे.
नवरात्रीच्या सणाचे औचित्य साधून स्कायव्हीजन एज्युकेशन फाउंडेशन आणि द टायग्रिष स्कुल तर्फे प्रथमच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आरोग्य, विधी, सुरक्षा, संगठन, मानसिक आरोग्य या विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती लावणार आहेत. महिलांचे काही सामाजिक व वैयक्तिक प्रश्न कायम अनुत्तरित राहतात, त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो. अशा परिस्थितीत काही महिला याच मानसिकतेशी चार हात करून विभिन्न क्षेत्रात सक्षमपणे महिलांचे प्रतिनिधित्व करत असतात. या महिलांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.
लोणी काळभोर आणि परिसरात महिलांचे सामाजिक प्रश्न आणि शारीरिक आरोग्य यावर अनेक वर्ष जनजागृती करणाऱ्या अंजली राईलकर महिलांना पहिल्या दिवशी मार्गदर्शन करणार आहेत. विधी आणि न्याय क्षेत्रात कर्यरत असणाऱ्या अॅड. वैशाली घुले जाधव महिलांना त्यांच्या वारस हक्क, कुटुंब कायदा आणि सामाजिक न्याय व्यवस्था याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
पोलीस उपनिरीक्षक विजया पंडित वंजारी, महिला अत्याचार व स्वःसुरक्षा याबाबत चर्चा करणार आहेत. इनरव्हील कूब, अप् टाऊन, पुणे च्या अध्यक्षा सुनंदा कदम आणि त्यांची टीम महिलांचे सामाजिक संगठन व त्याची उपयोजिता या विषयावर परिसंवाद साधणार आहेत. सामोपदेशक व मानसोपचार तज्ज्ञ आसावरी बापट महिलांचे मानसिक आरोग्य कसे सांभाळता येईल? या बाबत माहिती देणार आहेत.
वरील सर्व कर्यक्रम सोमवार (ता. 7) ते शुक्रवार (ता.11 ऑक्टोबर) या कालावधीत दररोज दुपारी 1 ते 3 या दरम्यान लोणी काळभोर येथील बाजारमळा रस्त्यावरील ‘द टायग्रिष स्कुल’मध्ये होणार आहे. या पहिला प्रतिनिधींचा स्कायव्हीजन एज्युकेशन फाउंडेशन तर्फे ‘अग्रगण्या’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, मेकअप आर्ट स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
दरम्यान, कोणत्याही कुटुंबाची जडण घडण त्या कुटुंबातील महिलेच्या मानसिक व शारीरिक निरोगी स्वास्थ्यावर अवलंबून असते, सध्याच्या व येणाऱ्या काळात शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपणे हि खूप महत्वाची गोष्ट बनत चालली आहे. त्या मुळे एकंदर या पद्धतीचे उपक्रम अत्यंत गरजेचे आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. तसेच या बाबत अधिक माहितीसाठी स्कुलशी संपर्क साधावा. असे आवाहन स्कायव्हीजन एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर वाघ यांनी केले आहे.
महिलांचे समाजमन निरोगी राहिले तर ते गाव आणि तो समाज निरोगी आणि आनंदी आयुष्य जगू शकेल. या भावनेतून महिलां मध्ये माहिती व जागृती होण्याच्या आम्ही या उपक्रमाची सुरुवात करत आहोत आणि या मध्ये अधिकाधिक महिलांनी सहभाग घ्यावा.
प्रशांत काळभोर (अध्यक्ष – स्कायव्हीजन एज्युकेशन फाउंडेशन)