राहुलकुमार अवचट : यवत
Yavat News : यवत, (पुणे) : १२ मे १८५४ फ्लोरेन्स नायटिन्गेल यांनी आधुनिक नर्सिंगचा पाया रचला त्यांच्याच स्मरणार्थ जगभरात हा दिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ साजरा केला जातो. यावेळी फ्लोरेन्स नायटिन्गेल यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प वाहण्यात आले.
पत्रकारांच्या वतीने शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान..
जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून यवत उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकांचा दौंड तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रामीण रुग्णालय वैदकीय अधीक्षक डॉ, बाळासाहेब कदम, डॉ.भूषण राक्षे , अधिपरिचरिका फरीन सय्यद, अंजली कदम, निलकमल कांबळे, रुग्णालय स्टाफ अंजुमन बागवान, अनुराधा जगताप, जेष्ठ पत्रकार एम. जी. शेलार, अनिल गायकवाड, मनोज खंडागळे, रुग्णालयाचे क्लार्क फुलचंद राख, गणेश शहाणे, स्वामी आधिपरिचारिका नायर, भुजबळ, भोसले , खराडे भानुसे, यांसह रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार एम.जी.शेलार यांनी रुग्णालयातील परिचारिका यांचा सत्कार करून वैदकीय क्षेत्रातील दीपस्तंभ फ्लॉरेन्स नाइन्टिंगल यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली.
दरम्यान, यावेळी अंजुमन बागवान यांनी ग्रामीण रुग्णालयात प्रथमच जागतिक परिचारिका दिन अशा पद्धतीने साजरा करून पत्रकारांनी सन्मान केल्याबद्दल आनंद होत असल्याचे सांगितले. डॉ. कदम व डॉ. राक्षे यांनी स्वागत केले तर फुलचंद राख यांनी पत्रकारांचे आभार व्यक्त केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Yavat Crime : नांदगावात शेतात काम करत नाही म्हणून एकाला मारहाण; यवत पोलीसात गुन्हा दाखल