Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nhavare News: घोड नदीवरील बंधाऱ्यावरून ट्रॅक्टर कोसळून नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; सुमारे साडे चार तासांच्या शोध कार्यानंतर मृतदेह सापडला….

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 5 October 2025, 22:30
Nhavare News: A ninth-grade student died after a tractor fell off a dam on the Ghod River; The body was found after a search operation of about four and a half hours....

Photo-Social Media

न्हावरे: शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी-हंगेवाडी (Nhavare News) दरम्यान घोड नदीवरील बंधाऱ्यावर शनिवारी (ता.4) दुपारी घडलेल्या भीषण अपघातात एका नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. शुभम राजेंद्र धायगुडे (वय 15, रा.हंगेवाडी, ता.श्रीगोंदा, जि.अ.नगर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून, त्याचे काका भानुदास साहेबराव धायगुडे हे थोडक्यात बचावले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

शनिवारी (ता.4) दुपारच्या सुमारास शुभम हा त्याचे काका भानुदास धायगुडे यांच्या सोबत खत आणण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये बसून शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी येथे गेला होता. त्यानंतर पुन्हा खत भरून माघारी येताना दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर घोड नदीवरील बंधाऱ्यावरून जात असताना चालकाचे लक्ष क्षणभर विचलित झाले. त्यामुळे वाहनाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर थेट नदीत कोसळला.

ट्रॅक्टर पाण्यात कोसळताच काका व पुतण्या दोघेही पाण्यात पडले. पोहता येत असल्याने भानुदास धायगुडे हे कसेबसे बाहेर पडले व त्यांनी स्वतःचा जीव वाचवला. मात्र शुभम धायगुडे पाण्याच्या प्रवाहात अडकून राहिला. बराच वेळ तो बाहेर न आल्याने ग्रामस्थांनी नदीकाठी धाव घेत शोधाशोध सुरू केली.

दरम्यान नदीतील पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने शोधमोहीम अडचणीत आली. घटनेची माहिती शिरूर आणि श्रीगोंदा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पाण्याचा वेग वाढल्याने ‘एनडीआरएफ’च्या पथकाला मदतीसाठी पाचारण करण्यात आले. सुमारे साडेचार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला. त्यावेळी शुभम हा ट्रॅक्टरच्या छतामध्ये अडकलेला आढळून आला. जास्त वेळ ट्रॅक्टरमध्ये अडकून राहिल्यामुळे शुभमचा मृत्यू झाला होता.

या घटनेमुळे हंगेवाडी आणि पिंपळसूटी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शुभम हा इयत्ता नववीत शिकत होता. अल्पवयातच त्याचा झालेला मृत्यू संपूर्ण परिसराला अंतर्मुख करून गेला आहे. त्यामुळे शिक्षकवर्ग, ग्रामस्थ आणि नातेवाईक यांच्यावर शोककळा पसरली आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीत सजावटीची गाडी घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला ‘लग्नाच्या ठिकाणी येऊन मारून टाकण्याची धमकी’; गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 16:32

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा पुरस्कार सोहळा उद्या बालेवाडीत; मान्याचीवाडीला विभागात प्रथम क्रमांक

Sunday, 29 November 2026, 16:15

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59
Next Post
Pune Jobs: Job opportunity at IIIT in Pune! Recruitment for engineer candidates; Know all the details

Pune Jobs: पुण्यातील IIITमध्ये नोकरीची संधी! इंजिनियर उमेदवारांसाठी भरती; जाणून घ्या सर्व तपशील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp