Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दाभोलकर हत्या प्रकरणाला नवं वळण! सचिन अंदुरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 18 August 2026, 13:13

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच त्याला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती देण्यात आली आहे.

न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. यापूर्वी या प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकर यालाही एप्रिलमध्ये उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. आता अंदुरेला जामीन मिळाल्याने या प्रकरणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 2024 मध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला दोन्ही आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने अंदुरेला जामीन देण्याचा निर्णय घेतला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील शिंदे पुलाजवळ मॉर्निंग वॉक करत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर तपास सुरू झाला आणि पुढे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.

 

या प्रकरणात वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी अंदुरे आणि कळसकर यांना दोषी ठरवण्यात आले, तर वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.

पुण्यातील विशेष न्यायालयात या खटल्याला 15 सप्टेंबर 2021 रोजी सुरुवात झाली होती. 10 मे 2024 रोजी न्यायालयाने निकाल दिला. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दाभोलकर हत्या प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Friday, 11 September 2026, 15:34

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15
Next Post

आधी भावाला लोकेशन पाठवलं, मग इंजिनिअर तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; शेतातलं दृश्य पाहून कोल्हापूर हादरलं!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp