Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूरमध्ये सावकाराचा कारनामा! कर्ज फेडलं नाही म्हणून महिलेवरच टाकला हात; सावकाराविरोधात गुन्हा दाखल

योगेश मारणेby योगेश मारणे
Thursday, 20 August 2026, 17:38

न्हावरे: कर्जाच्या पैशांची परतफेड न झाल्यामुळे कापड दुकानदार महिलेचा विनयभंग करण्यात आला. तसेच महिलेच्या पतीला मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी वडगाव रासाई (ता.शिरूर) येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडली आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने भाऊसाहेब दामोदर वाबळे, जया भाऊसाहेब वाबळे आणि प्रेम ऊर्फ भैय्या भाऊसाहेब वाबळे सर्व जण (रा.वडगाव रासाई, ता.शिरूर, जि.पुणे) यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मांडवगण फराटा येथे पीडित महिलेच्या कपड्याच्या दुकानात भाऊसाहेब वाबळे, जया वाबळे व प्रेम उर्फ भैय्या वाबळे हे आले.त्यानंतर भाऊसाहेब बावळे व त्यांचा मुलगा प्रेम ऊर्फ भैय्या बावळे यांनी पीडित महिलेच्या पतीने सन २०१४ मध्ये व्याजाने सात लाख रुपये घेतलेल्या पैशांच्या व्यवहाराचा विषय काढला.

काही रक्कम पीडित महिलेच्या पतीने व्याजासह परत केली होती. परंतु,भाऊसाहेब वाबळे यांनी पीडित महिलेच्या पतीला पुन्हा पैशांची मागणी केली. याचवेळी दुकानातील व्यवहारावरून वाद घालून भाऊसाहेब वाबळे, जया वाबळे आणि प्रेम वाबळे यांनी पीडित महिला व तिच्या पतीला दमदाटी केली तसेच याप्रसंगी प्रेम ऊर्फ भैय्या याने पीडित महिलेचा हात पकडून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

 

त्यानंतर पैसे न दिल्यास पीडित महिलेचे दुकान पेटून देण्याची धमकी वाबळे यांच्याकडून देण्यात आली. तसेच पीडीतेच्या पतीस जीवे मारण्याचीही धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शिरूर पोलिसांनी विनयभंग,धमकी तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्या अंतर्गत भाऊसाहेब दामोदर वाबळे, जया भाऊसाहेब वाबळे आणि प्रेम ऊर्फ भैय्या भाऊसाहेब वाबळे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप पर्यंत आरोपींना अटक झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! रखडलेला कात्रज-कोंढवा रस्ता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे टार्गेट

Wednesday, 30 September 2026, 22:10

मुंबईसह राज्यभरात गरबा-दांडिया रद्द होणार? दुष्काळाच्या सावटाखाली गरबा-दांडियाचा मुद्दा तापला; मराठी एकीकरण समितीचा थेट विरोध

Wednesday, 30 September 2026, 21:05

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी सुनावणी! खरातच्या ‘त्या’ व्हिडिओंबाबत कोर्टाचा महत्वाचा आदेश; ‘व्हिडीओ वकिलांना दाखवा पण…’

Wednesday, 30 September 2026, 20:26

दुबईहून तेल अवीव जाणाऱ्या विमानात हायजॅकचा थरार! ९/११ सारख्या हल्ल्याचा कट? कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूहल्ला; नेमकं काय घडलं?

Wednesday, 30 September 2026, 19:57

पृथ्वीराज कपूर हायस्कूल तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

Wednesday, 30 September 2026, 19:34

सासरच्या त्रासाला कंटाळून पिंपळगाव येथे विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 30 September 2026, 19:28
Next Post

महागड्या गाड्या, कपडे अन् इंस्टाग्रामच्या फोटोवरून भाऊच भावावर जळायचा! फोटो काढायच्या बहाण्याने बोलावलं अन् केला गेम...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp