Monday, August 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांच्या पत्नी उर्मिला कराड यांचे निधन…! अंत्यसंस्कार उद्या (गुरुवारी) सकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे होणार…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 20 July 2022, 20:19

पुणे : माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या पत्नी व ज्येष्ठ कवयित्री, लेखिका व उर्मिला विश्वनाथ कराड यांचे बुधवारी सायंकाळी आकस्मिक निधन झाले. लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, पुतणे, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एमआयटी संस्थेच्या जडणघडणीत प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांना त्यांनी मोलाची साथ दिली. सोबतच कवयित्री व लेखिका म्हणून त्यांनी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.

मूळच्या नाशिकच्या असलेल्या उर्मिला कराड यांचे शिक्षण नाशिकच्या एच. पी. टी. महाविद्यालयातून झाले. १९६४ साली त्यांनी मराठी विषयात बी. ए. (ऑनर्स) ही पदवी प्रथम क्रमांकाने संपादित केली. लग्नानंतर त्या लातूर येथील रामेश्वर (रुई) आल्या. त्यांचे माहेर व सासर ही दोन्ही घराणी संपूर्ण वारकरी सांप्रदायाची असल्याने त्यांच्या मनावर संतसाहित्याचा विशेष प्रभाव होता. लहानपणापासून त्यांना काव्यलेखनाची आवड होती. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज हे त्यांचे स्फूर्तिस्थान होते.

ह.भ.प. संतु राजाराम पाटील हे त्यांचे वडील होते. ते अतिशय विद्वान, निष्ठावंत वारकरी आणि हाडाचे शिक्षक होते. त्यांच्या संस्कारातून त्या घडल्या. लग्नानंतर खेड्यातील वातावरण, घरात सतत माणसांचा राबता, रगाडा आणि कष्टाची कामे यातही त्यांनी त्यांचे कविमन जपले, जोपासले. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘समीर’ हा १९८९ मध्ये प्रकाशित झाला. पुढे त्यांनी ‘अरे संसार संसार’, ‘अनुभूती’, ‘माझी माय दुधावरची साय’ यासह अनेक लोकप्रिय कवितासंग्रह त्यांनी लिहिले. विविध वृत्तपत्रांतून त्यांनी अनेक विषयांवर विपुल लेखन केले. संत साहित्यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. विविध साहित्य संमेलने, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमातील त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. गेली अनेक वर्षे पंढरपूरची पायी वारी त्या करत असत.

त्यांच्या विपुल लेखनाबद्दल, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे. सुरसंगम परिवारातर्फे ‘वत्सल माता गुरुमाई पुरस्कार’, आदी पुरस्कार त्यांना मिळाले होते.

 

एमआयटी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या मातोश्री, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, तसेच आमदार रमेश कराड यांच्या त्या चुलती होत. उर्मिला कराड यांचे पार्थिव परमहंसनगर, कोथरूडमधील ज्ञानमंदिर या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी गुरुवारी (ता. 21) सकाळी ९ ते ९.३० या वेळेत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर १०.३० च्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कराड कुटुबियांनी दिली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MIT-ADTच्या तेजस पाटीलची मोठी कामगिरी; राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारतासाठी पटकावले रौप्यपदक

Monday, 10 August 2026, 13:43

‘तुम्हाला बेडरूममध्ये सोबत पाहिलंय’, पत्नी-घरमालकाचं अफेअर उघड झालं; पतीला गप्प करण्यासाठी ॲसिड पाजलं अन्…

Monday, 10 August 2026, 12:57

3.14 लाख घेतले, 10.84 लाख दिले; तरी सावकार करत होता आणखी पैशांची मागणी, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातच झाला राडा

Monday, 10 August 2026, 12:36

दुधात चक्क शाम्पू आणि केमिकल्स! महाराष्ट्रातील भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; पुण्यातून आणखी 10 आरोपींना अटक

Monday, 10 August 2026, 11:08

शिंदवणे घाटात 50 हजार चौरस फुटांवर जलसंधारण अन् 250 झाडांची लागवड; मायभू सेवा यात्रेत ‘शिवम प्रतिष्ठान’ व ‘ड्रीम्स युवा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम!

Monday, 10 August 2026, 10:44

मराठा आरक्षणावर टांगती तलवार? सुनावणी पुन्हा लांबण्याची शक्यता; नेमकं कारण काय? जाणून घ्या

Monday, 10 August 2026, 10:40
Next Post

पुणे- सोलापूर महामार्गावर भादलवाडी येथे कंटेनर व चारचाकी गाडीत झालेल्या अपघातात सोलापूर येथील एकाचा मृत्यू…!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.