Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फ्लॅट विक्रीतील 2.64 कोटींचा अपहार! पुण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 4 August 2026, 16:26

पुणे : बावधन बुद्रुक येथील वडिलोपार्जित जमीन विकसित करून जमीनमालकाच्या वाट्याला आलेले तीन फ्लॅट विकल्यानंतर, विक्रीतून मिळालेली तब्बल 2 कोटी 64 लाख 80 हजार 650 रुपयांची रक्कम न देता फसवणूक केल्याच्या आरोपावरून कोथरूड पोलिसांनी एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी तुषार गणपत दगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विकासक रुपेश हरिभाऊ कुंबरे आणि कांचन रुपेश कुंबरे यांच्याविरोधात 1 ऑगस्ट 2026 रोजी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडे कुटुंबीयांच्या बावधन बुद्रुक येथील वडिलोपार्जित जमिनीच्या विकासासाठी 2011 मध्ये संबंधित विकासक कंपनीसोबत अधिकृत करार करण्यात आला होता. या जागेवर उभारण्यात आलेल्या ‘आर. के. ग्रेसिया’ या गृहप्रकल्पातील काही फ्लॅट कराराप्रमाणे जमीनमालकांच्या वाट्याला आले होते. हे फ्लॅट बाजारात चांगल्या आणि अधिक दराने विकून देण्याचे आश्वासन देऊन विकासकांनी जमीनमालकांकडून कुलमुखत्यारपत्र लिहून घेतले होते.

फिर्यादी तुषार दगडे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या एकत्रित हिस्स्यातील फ्लॅट क्रमांक ३०१, ९०२ आणि ११०२ यांची विक्री करून विकासकांनी एकूण ५ कोटी २९ लाख ६१ हजार ३०० रुपये प्राप्त केले. मात्र, या व्यवहारातील त्यांच्या स्वतःच्या वाट्याची २ कोटी ६४ लाख ८० हजार ६५० रुपयांची रक्कम विकासकांनी त्यांना दिलीच नाही.

 

जेव्हा फिर्यादींनी आपल्या हक्काच्या रकमेची वारंवार मागणी केली, तेव्हा आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर, पैसे मागितल्यास जीवे मारण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हा सर्व कथित प्रकार २०११ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत घडला आहे.

दरम्यान, याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी आरोपी रुपेश कुंबरे आणि कांचन कुंबरे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१६(२), ३१६(५), ३५१(२), ३१८(४),३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर प्रकरणाचा पुढील सखोल तपास कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र एकनाथ आळेकर करत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

भारत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष पुनर्रचनेचे सुधारित वेळापत्रक जाहीर!

Tuesday, 4 August 2026, 20:55

‘गुंगी गुडिया’ टीकेला सुनेत्रा पवारांचा 5 शब्दांत सणसणीत पलटवार; काँग्रेसची बोलती बंद!

Tuesday, 4 August 2026, 20:35

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ऐन पावसाळ्यात शहराच्या ‘या’ महत्त्वाच्या भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

Tuesday, 4 August 2026, 20:06

शरद पवारांचा मोठा निर्णय! पक्षातील बड्या नेत्यांना पदावरून हटवलं; तातडीचे आदेश जारी

Tuesday, 4 August 2026, 19:43

पुण्यात लाचखोरीचा पर्दाफाश! २ कोटींच्या दंडाची भीती दाखवून मागितली १० लाखांची लाच; शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील प्रकाराने महसूल विभागात खळबळ

Tuesday, 4 August 2026, 19:30

राशीनच्या श्री जगदंबा मंदिर प्रकरणाला नवे वळण ..! मंदिराच्या मोजणीला न्यायालयाची स्थगिती

Tuesday, 4 August 2026, 19:29
Next Post

पुण्यात मद्यधुंद हवालदाराचा राडा! पोलीस व्हॅन चालवतांना कारला दिली जोरदार धडक; जागीच ७ वाहनांचा चुराडा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.