Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘गुंगी गुडिया’ वक्तव्य काँग्रेसला भोवणार?हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी, दिल्लीत पडसाद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 4 August 2026, 17:55

पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने ‘गुंगी गुडिया’ अशी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन वैयक्तिक टीका केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि भाजपकडून या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या अधिकृत अकाऊंटवरून केलेल्या या विधानाचे जाहीर समर्थन केले.त्यामुळे आता त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे.

काँग्रेसच्या या भूमिकेनंतर सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर ताशेरे ओढत म्हटले की, महाविकास आघाडीतील नेत्यांना जनतेकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि चर्चेत येण्यासाठीच ही खालच्या पातळीवरची विधाने केली जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत आणि संस्कृतीत इतक्या निकृष्ट दर्जाची वक्तव्ये होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी या संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या अशा मनोवृत्तीमुळे महाराष्ट्राची जनता त्यांना निवडणुकीत योग्य धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी दिला. काकडे यांनी थेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून तात्काळ हटवले पाहिजे, अशी आक्रमक मागणी करत जर त्यांनी हे विधान मागे घेऊन माफी मागितली नाही, तर काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला राज्यात मोकळेपणाने फिरू दिले जाणार नाही आणि त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा काकडे यांनी दिला आहे.

केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि सुपारी घेऊन अशी वक्तव्ये केली जात असल्याचा घणाघातही संजय काकडे यांनी केला. एका महिला नेत्याबद्दल इतक्या हीन दर्जाची टिप्पणी करणाऱ्या काँग्रेस अध्यक्षांची पदावर राहण्याची लायकीच उरलेली नाही, असे म्हणत त्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. या प्रकरणामुळे काँग्रेस आणि महायुतीतील नेत्यांमध्ये मोठा वाद पेटला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भारत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष पुनर्रचनेचे सुधारित वेळापत्रक जाहीर!

Tuesday, 4 August 2026, 20:55

‘गुंगी गुडिया’ टीकेला सुनेत्रा पवारांचा 5 शब्दांत सणसणीत पलटवार; काँग्रेसची बोलती बंद!

Tuesday, 4 August 2026, 20:35

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ऐन पावसाळ्यात शहराच्या ‘या’ महत्त्वाच्या भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

Tuesday, 4 August 2026, 20:06

शरद पवारांचा मोठा निर्णय! पक्षातील बड्या नेत्यांना पदावरून हटवलं; तातडीचे आदेश जारी

Tuesday, 4 August 2026, 19:43

पुण्यात लाचखोरीचा पर्दाफाश! २ कोटींच्या दंडाची भीती दाखवून मागितली १० लाखांची लाच; शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील प्रकाराने महसूल विभागात खळबळ

Tuesday, 4 August 2026, 19:30

राशीनच्या श्री जगदंबा मंदिर प्रकरणाला नवे वळण ..! मंदिराच्या मोजणीला न्यायालयाची स्थगिती

Tuesday, 4 August 2026, 19:29
Next Post

क्रूरतेचा सीमा ओलांडल्या! पुण्यात ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडाला फेव्हि क्विक चिटकवून जखमा; कौंटुंबिक वादातून काकूचं भयानक कृत्य...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.