Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात लाचखोरीचा पर्दाफाश! २ कोटींच्या दंडाची भीती दाखवून मागितली १० लाखांची लाच; शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील प्रकाराने महसूल विभागात खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 4 August 2026, 19:30

पुणे: पुण्यातील शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील एका तलाठी आणि कोतवालाविरोधात तब्बल १० लाख रुपयांच्या लाच मागणीप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. खोदकाम परवानगीशी संबंधित पंचनाम्याचा अहवाल अनुकूल करण्यासाठी ही लाच मागितल्याचा आरोप असून, या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ३७ वर्षीय खोदकाम कंत्राटदार आहेत. त्यांच्या फर्ममार्फत सेनापती बापट रस्त्यावरील सर्वे क्रमांक ९६७ येथे एका व्यावसायिक प्रकल्पाच्या इमारतीच्या पायासाठी खोदकाम सुरू होते. या कामाचा पंचनामा शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील तलाठी आश्विनी दत्तात्रय कोकाटे यांनी केला होता.

पंचनामा करताना सुमारे ३२०० ब्रास अतिरिक्त खोदकाम झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सुमारे दोन कोटी रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो, असे सांगून तहसीलदारांकडे ‘निल पंचनामा’ अहवाल सादर करण्यासाठी १० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराने १५ जून २०२६ रोजी पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर १६ जून रोजी एसीबीने पडताळणी केली. त्यामध्ये तलाठी आश्विनी कोकाटे यांनी १० लाख रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती रक्कम शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील कोतवाल महेश मधुकर मुंढे याच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने म्हटले आहे. तसेच कोतवाल महेश मुंढे यानेही ही रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे तपासात स्पष्ट झाले.

 

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०५/२०२६ नोंदविण्यात आला असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७ आणि १२ अंतर्गत मंगळवारी (४ ऑगस्ट) सायंकाळी ४.३३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे यांनी केले. पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली ही कारवाई पार पडली. या प्रकरणाचा पुढील तपास भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भारत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष पुनर्रचनेचे सुधारित वेळापत्रक जाहीर!

Tuesday, 4 August 2026, 20:55

‘गुंगी गुडिया’ टीकेला सुनेत्रा पवारांचा 5 शब्दांत सणसणीत पलटवार; काँग्रेसची बोलती बंद!

Tuesday, 4 August 2026, 20:35

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ऐन पावसाळ्यात शहराच्या ‘या’ महत्त्वाच्या भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

Tuesday, 4 August 2026, 20:06

शरद पवारांचा मोठा निर्णय! पक्षातील बड्या नेत्यांना पदावरून हटवलं; तातडीचे आदेश जारी

Tuesday, 4 August 2026, 19:43

पुण्यात लाचखोरीचा पर्दाफाश! २ कोटींच्या दंडाची भीती दाखवून मागितली १० लाखांची लाच; शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील प्रकाराने महसूल विभागात खळबळ

Tuesday, 4 August 2026, 19:30

राशीनच्या श्री जगदंबा मंदिर प्रकरणाला नवे वळण ..! मंदिराच्या मोजणीला न्यायालयाची स्थगिती

Tuesday, 4 August 2026, 19:29
Next Post

शरद पवारांचा मोठा निर्णय! पक्षातील बड्या नेत्यांना पदावरून हटवलं; तातडीचे आदेश जारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.