Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिवे घाटातील रस्त्याच्या कामावरून ठेकेदारांमध्ये राडा; कॉन्ट्रॅक्टरला मारहाण करून जबरदस्ती कारमध्ये बसवले अन…

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 August 2026, 17:30

फुरसुंगी : दिवे घाटातील रस्त्याच्या खोदाई व कटिंगच्या कामावरून दोन ठेकेदारांमध्ये वाद उफाळून आला असून, एका ठेकेदाराला मारहाण करून जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवून नेल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (ता. २) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास समोर आला आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोन जणांसह पाच ते सहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित तावरे, शिवराज तावरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या पाच ते सहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर नारायण भोसले (वय ५३, रा. चंदननगर, पुणे) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर भोसले यांची ईश्वर डेव्हलपर्स नावाची सिव्हिल कंत्राटदार कंपनी असून, रस्त्यांची खोदाई व रोड कटिंगची कामे करते. एप्रिल २०२५ मध्ये त्यांच्या कंपनीने दिवे घाटातील रस्त्याच्या खोदाईचे काम आर अँड सी कंपनीकडून घेतले होते. या प्रकल्पातील विविध टप्प्यांची कामे अनेक कंत्राटदारांना देण्यात आली होती.

 

दरम्यान, सेल्फी पॉईंटसमोरील काम पूर्वी कंत्राटदार सुजित झेंडे यांच्याकडे होते. त्यांनी ते काम काही कारणास्तव थांबविल्यानंतर आर.अँड.सी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संमतीने ते काम ज्ञानेश्वर भोसले यांनी सुरू केले होते. शनिवारी (ता. २) दिवसभर काम सुरू असताना दुसरे कंत्राटदार अमित तावरे यांच्या कामगारांकडून त्याच ठिकाणी काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. आर.अँड. सी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे दोन्ही पक्षांना काम थांबविण्याचे सांगून दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

मात्र, त्याच रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अमित तावरे, त्यांचा मुलगा शिवराज तावरे आणि त्यांच्यासोबत पाच ते सहा जण सेल्फी पॉईंटजवळील कामाच्या ठिकाणी आले. त्यांनी “आमचे काम का बंद केले?” असा जाब विचारत फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधितांनी ज्ञानेश्वर भोसले यांना जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवून त्यांच्यावर मारहाण केली. तसेच गाडीतून बाहेर पडण्यासही मज्जाव केला. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी पाठविल्यानंतर त्यांनी उपचार घेत फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी अमित तावरे, शिवराज तावरे आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ, बेकायदेशीरपणे अडवून ठेवणे व अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिवे घाटातील रस्त्याच्या कामावरून ठेकेदारांमध्ये राडा; कॉन्ट्रॅक्टरला मारहाण करून जबरदस्ती कारमध्ये बसवले अन…

Tuesday, 4 August 2026, 17:30

अखेर खामगाव टेक येथील बेपता आजी तीन दिवसांनंतर सापडली; पुणे रेल्वे स्थानकावर चहातून गुंगीचे औषध देऊन दाम्पत्याने लुटले..

Tuesday, 4 August 2026, 17:29

पुण्यात मद्यधुंद हवालदाराचा राडा! पोलीस व्हॅन चालवतांना कारला दिली जोरदार धडक; जागीच ७ वाहनांचा चुराडा…

Tuesday, 4 August 2026, 16:42

फ्लॅट विक्रीतील 2.64 कोटींचा अपहार! पुण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल..

Tuesday, 4 August 2026, 16:26

राजकारणात नवा वाद! काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांवर बोचरी टीका; ‘गुंगी गुडीया ‘म्हणत उडवली खिल्ली

Tuesday, 4 August 2026, 16:19

सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खूशखबर! मुंबई, पुणेसह ‘या’ प्रमुख मार्गावरील विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या

Tuesday, 4 August 2026, 16:02
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.