Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“मला ओळखतो का?” म्हणत मजुरावर जीवघेणा हल्ला; फुरसुंगी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 August 2026, 17:33

लोणी काळभोर, ता. ४ : कामावरून मध्यरात्री घरी परतणाऱ्या एका मजुराला रस्त्यात अडवून “मला ओळखतो का?” असा जाब विचारत लाकडी दांडक्याने डोक्यावर वार करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी (ता.हवेली) परिसरात सोमवारी (ता. 4) घडली. या प्रकरणी एका संशयितासह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विलास सुदाम गिरी (वय 53, रा. चंदवाडी, जुना कॅनालजवळ, फुरसुंगी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल राजू शिंदे (वय 35, रा. चंदवाडी, जुना कॅनालजवळ, फुरसुंगी) आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास गिरी हे फुरसुंगी येथील एका मशिनरी पार्ट्सच्या गोदामात मागील वर्षभरापासून काम करतात. सोमवारी (ता. ४) मध्यरात्री सुमारे १२.१० वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून कामावरून घरी परतत असताना चंदवाडी येथील जुन्या कॅनालजवळील सार्वजनिक रस्त्यावर त्यांच्या दुचाकीसमोर विशाल शिंदे आडवा आला.

 

विशाल शिंदे आणि त्याच्यासोबतचे दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. विशालने “मला ओळखतो का?” अशी विचारणा केली. त्यावर “तू आमच्याच वस्तीमध्ये राहतोस, मला घरी जायला उशीर होतोय, मला जाऊ दे,” असे विलास गिरी यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर विशाल शिंदे याने संतापाच्या भरात जवळ पडलेला लाकडी दांडका उचलून त्यांच्या डोक्यावर जोरदार वार केला.

याचवेळी त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनीही फिर्यादीला हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर जखमी विलास गिरी यांना संतोष ढोरे आणि विनायक कामठे यांनी तातडीने भेकराईनगर येथील हरपळे डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, फुरसुंगी पोलिसांनी विशाल राजू शिंदे व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी तसेच अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘गुंगी गुडिया’ वक्तव्य काँग्रेसला भोवणार?हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी, दिल्लीत पडसाद

Tuesday, 4 August 2026, 17:55

पुण्यात वेश्याव्यवसाय करायची गर्लफ्रेंड! संबंध तोडल्याच्या रागातून डोकं फिरलं अन् बॉयफ्रेंडने निर्घृणपणे संपवलं, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा…

Tuesday, 4 August 2026, 17:36

“मला ओळखतो का?” म्हणत मजुरावर जीवघेणा हल्ला; फुरसुंगी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा…!

Tuesday, 4 August 2026, 17:33

दिवे घाटातील रस्त्याच्या कामावरून ठेकेदारांमध्ये राडा; कॉन्ट्रॅक्टरला मारहाण करून जबरदस्ती कारमध्ये बसवले अन…

Tuesday, 4 August 2026, 17:30

अखेर खामगाव टेक येथील बेपता आजी तीन दिवसांनंतर सापडली; पुणे रेल्वे स्थानकावर चहातून गुंगीचे औषध देऊन दाम्पत्याने लुटले..

Tuesday, 4 August 2026, 17:29

पुण्यात मद्यधुंद हवालदाराचा राडा! पोलीस व्हॅन चालवतांना कारला दिली जोरदार धडक; जागीच ७ वाहनांचा चुराडा…

Tuesday, 4 August 2026, 16:42
Next Post

पुण्यात वेश्याव्यवसाय करायची गर्लफ्रेंड! संबंध तोडल्याच्या रागातून डोकं फिरलं अन् बॉयफ्रेंडने निर्घृणपणे संपवलं, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.