लोणी काळभोर (पुणे) : नवनिर्वाचित आमदार माऊली आबा कटके यांच्या अभिनंदनाचा फलक लावण्यात आला होता. या फलकातील आरोग्यदूत थेऊर ग्रामपंचायतीचे सदस्य युवराज काकडे यांचे छायाचित्र असलेला भाग अनोळखी व्यक्तीकडून फाडण्यात आला आहे.
थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील काकडे मळा परिसरात माऊली आबा कटके यांचा युवराज काकडे मित्र मंडळाकडून अभिनंदनाचा फलक लावण्यात आला होता. हा फ्लेक्स फाडल्यानंतर सोशल मिडीयावर उलटसुलट प्रतिक्रिया सुरु आहेत.
थेऊर परिसरातील काकडे मळा परिसरात शिरूर – हवेली विधान सभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माऊली आबा कटके यांचा विजय झाला आहे. याबद्दल परिसरात युवराज काकडे मित्र मंडळाकडून युवराज काकडे यांचा माऊली आबांना शुभेच्छा देणारा फ्लेक्स फाडण्यात आला. या प्रकारामुळे परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक झाले असून बॅनर फाडणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत युवराज काकडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी सध्या मुंबईत आहे. या फ्लेक्स फाडल्याची माहिती सध्या मला फोनवरून कार्यकर्त्यांकडून मिळाली आहे. या घटनेचा जाहीर तीव्र निषेध करतो असे बोर्ड फाडून राग व्यक्त करणे हे योग्य नाही. आम्ही हवेलीची अस्मिता जपली आणि माऊलीआबांचे प्रामाणिकपणे काम केले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. माऊली आबाचे काम प्रामाणिकपणे केल्याने असे कृत्य करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.