Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्ती येथील जेके सेल्सच्या गोडाऊनला भीषण आग; सुमारे 2 कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 20 October 2025, 12:39
Massive fire breaks out at JK Sales godown in Kadamwakvasti; Electronics worth around Rs 2 crore gutted

Photo- Pune Prime News

लोणी काळभोर, ता. 20: पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या जेके सेल्सच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिवम हॉस्पिटलच्या परिसरात रविवारी (ता.19) रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या आगीत सुमारे 2 कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यामुळे ऐन दिवाळीत दुकानदारावर मोठे संकट कोसळले आहे.

लोणी काळभोर येथील जेके सेल्स हे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीचे नामवंत दुकान आहे. हे दुकान अक्षय काळभोर व फिरोज खान मेटकरी हे दोघे भागीदारी तत्वावर चालवितात. या दुकानातून टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, कुलर, एसी, पिठाची गिरणी, फॅन, गिझर, फिल्टरसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री केली जाते. या दुकानाचे गोडाऊन शिवम हॉस्पिटलच्या रस्त्यावर आहे. या गोडावूनमध्ये अंदाजे 2 कोटींहून अधिक रुपयांचा माल ठेवलेला होता.

दरम्यान, काही नागरिकांना गोडाऊनच्या बाहेर वायरचे शॉर्टसर्किट झाल्याचे रविवारी (ता.19) रात्री आढळून आले. आणि गोडाऊनच्या दिशेने जाणारी वायर जळत असताना दिसली. त्यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती तत्काळ जेके सेल्सचे संचालक अक्षय काळभोर व फिरोज खान मेटकरी यांना दिली. घटनास्थळावर पोहचेपर्यंत गोडाऊनच्या शटर मधुन मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत होता. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले होते. गोडाऊन भक्ष्यस्थानी पडले.

या घटनेची माहिती तत्काळ हडपसर येथील अग्निशामक दलाला देण्यात आली. तोपर्यंत नागरिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीचे लोट बाहेर पडत होते. शेवटी जेके सेल्सच्या संचालक आणि कामगारांनी गोडावूनचे चारही शटर तोडून टाकले. आणि वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्व वस्तूंनी पेट घेतला होता.

 

यादरम्यान, फ्रीजमधील गॅसचा स्फोट झाला. त्यावेळी नागरिकांची पळापळ झाली. त्यानंतर अर्ध्या तासानंतर हडपसर येथील अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा केला परंतु, आग पूर्णपणे आटोक्यात आली नव्हती. त्यानंतर अग्निशामक दलाची दुसरी गाडी बोलावण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना आग पूर्णपणे विझविण्यात यश आले. परंतु, तोपर्यंत आगीत सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या.

 सुमारे 5 कोटी रुपयांचे नुकसान

मागील एक महिन्यापूर्वी कदमवाकवस्ती येथे अतिवृष्टी झाली होती. यावेळी जेके फर्निचर, जेके सेल्स इलेक्ट्रॉनिक्स गोडाऊन, आर वर्ड इंटरियर मॉड्युलर फॅक्टरी या तीन व्यावसायिक दुकानांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे 3 कोटींहून अधिक रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले होते. त्यातच आता जेके सेल्स इलेक्ट्रॉनिक्स गोडाऊन जळून खाक झाले आहे. यामध्ये 2 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. असे एकूण 5 कोटी रुपयांचा दुकानदाराला फटका बसला आहे. लवकर मदत मिळाली नाही तर दुकानदार भुईसपाट होतील.

 दिवाळीचा सन असल्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू येत जात होती. परंतु, गोडावून मधील 350 फ्रिज, 50 टीव्ही, 90 वॉशिंग मशीन, 40 कुलर, 70 एसी, 12 पिठाची गिरणी, 5 फॅन, 40 गिझर, 25 फिल्टरसह अशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळाल्या असल्याचा अंदाज आहे. यामुळे 2 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

-फिरोज खान मेटकरी (नुकसानग्रस्त व्यावसायिक)

 

ऐन दिवाळीत शॉर्टसर्किट झाल्यामुळे आम्ही आर्थिक संकटात सापडलो आहे. विमा कंपन्यांनी त्वरित पंचनामा करून जास्तीतजास्त नुकसान भरपाई द्यावी. बँकांनी कर्जफेडीसाठी मुदत वाढवून द्यावी.  तसेच व्यवसायाला पुन्हा उभा राहण्यासाठी आर्थिक मदत करावी.

-अक्षय काळभोर (नुकसानग्रस्त व्यावसायिक)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा तापला! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरोधात हायकोर्टात अवमान याचिका दाखल

Saturday, 29 August 2026, 11:45

लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई! 1 किलो गांजासह तस्कराला ठोकल्या बेड्या

Saturday, 29 August 2026, 11:35

पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने मागितली 25 लाखांची लाच, साडे 5 लाखांची लाच घेताना दोघे अडकले एसीबीच्या जाळ्यात, माळशिरस तालुक्यात एसीबीची धडक कारवाई

Saturday, 29 August 2026, 11:29

पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून रस्त्यात अडवलं; पुण्यात पुढे जे घडलं ते धक्कादायक

Saturday, 29 August 2026, 11:18

सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक; चांदीही महागली; जाणून घ्या आजचा भाव

Saturday, 29 August 2026, 11:06

प्रेयसीला आजार असल्याचे कळताच प्रियकराने बदलले रंग! पुण्यात 19 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Saturday, 29 August 2026, 10:39
Next Post

Pune News: शनिवार वाड्यातील कबरीवरून धार्मिक वाद उफाळला; हिंदू संघटनांनी 8 दिवसात कबर हटवण्याची केली मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp