Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुटखा विक्रेत्याला मोठा दणका! वढू खुर्दमध्ये FDA ची धाड; 165 पाऊच जप्त

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 3 September 2026, 11:34

लोणीकंद, (पुणे): अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या वढू खुर्द येथील दुकानावर धाड टाकून साठा जप्त केला. या कारवाईनंतर दुकान सिलबंद करण्यात आले असून विक्रेत्याविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणीकंद पोलिसांचे कर्मचारी आणि अन्न सुरक्षा विभागाच्या पथकासह एमएच-12 पान शॉप, पॉवर हाऊस, आळंदी रोड, वढू खुर्द येथे सोमवारी (ता. 31) ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी विक्रेता लंकेश मच्छिंद्र भोंडवे (वय 27) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी सायली शंकर टाव्हरे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता पंच, लोणीकंद पोलिसांचे कर्मचारी आणि अन्न सुरक्षा विभागाच्या पथकासह एमएच-12 पान शॉप, पॉवर हाऊस, आळंदी रोड, वढू खुर्द येथे तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विक्रेता लंकेश भोंडवे याच्या दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. पथकाने विमल, व्ही-1, रजनीगंधा, RMD, डायरेक्टर स्पेशल आणि गोवा 1000 या ब्रँडचे एकूण 165 पाऊच जप्त केले. जप्त मालाची किंमत 1,690 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, अधिकाऱ्यांनी साठ्याबाबत खरेदी बिल व पुरवठादाराची माहिती विचारली असता विक्रेत्याने कोणतीही माहिती अथवा कागदपत्रे सादर केली नाहीत. जप्त केलेला संपूर्ण साठा विश्लेषणासाठी पाठविण्यात आला असून पुनर्विक्री होऊ नये म्हणून दुकान सिलबंद करण्यात आले आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुरवठादारापर्यंत सखोल तपास सुरू आहे.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातून तरुणाच अपहरण; समृद्धी महामार्गावर 3 किमी थरारक पाठलाग, एका तरुणीसह 6 जण पोलिसांच्या ताब्यात

Thursday, 3 September 2026, 11:43

गुटखा विक्रेत्याला मोठा दणका! वढू खुर्दमध्ये FDA ची धाड; 165 पाऊच जप्त

Thursday, 3 September 2026, 11:34

हायकोर्टात ठाकरे सेनेला दणका! विशाखा राऊतांची याचिका फेटाळली; नगरसेवकपदावर टागंती तलवार

Thursday, 3 September 2026, 11:12

पुणेकरांनो, बसने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा! दहीहंडीमुळे PMPMLचे मार्ग बदलले

Thursday, 3 September 2026, 11:07

पुण्यात भाजप नेत्याच्या घराबाहेर मध्यरात्री राडा! दोन चारचाकींची तोडफोड, CCTV च्या वायरही तोडल्या..

Thursday, 3 September 2026, 10:54

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; अंतरवालीत मराठा आंदोलकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Thursday, 3 September 2026, 10:38
Next Post

पुण्यातून तरुणाच अपहरण; समृद्धी महामार्गावर 3 किमी थरारक पाठलाग, एका तरुणीसह 6 जण पोलिसांच्या ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp