Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवजात बाळविक्री प्रकरणात मोठी कारवाई; 24 दिवसांपासून फरार डॉक्टर दाम्पत्याला अटक

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 12 November 2026, 10:47

अमरावती: अमरावती शहरात चर्चेचा विषय ठरलेल्या नवजात अर्भक विक्री प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तब्बल 24 दिवस फरार असलेल्या डॉ. वैशाली भोजने आणि त्यांचे पती प्रफुल्ल भोजने यांना अखेर अटक करण्यात आली आहे. अमरावती पोलिसांनी साईनगर अकोली परिसरात सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेमुळे या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाची सुरुवात 15 ऑक्टोबर रोजी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. वैशाली भोजने यांच्या रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली होती. त्यानंतर जन्मलेल्या नवजात बाळाची परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विक्री करण्यात आल्याचा आरोप डॉक्टर आणि त्यांच्या पतीवर आहे. या व्यवहारासाठी 3 लाख 50 हजार रुपये ठरल्याचा दावाही करण्यात आला आहे.

शिवसेना (शिंदे गट) नेत्या वर्षा भोयर आणि कोमल बद्रे यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला. मात्र, कारवाईची चाहूल लागताच भोजने दाम्पत्य फरार झाले होते.

दरम्यान, अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानेही या प्रकरणाची दखल घेत संबंधित रुग्णालयातील नियमबाह्य कामकाजाच्या आरोपांवर कारवाई केली. रुग्णालयाला सील ठोकण्यात आले होते. दुसरीकडे, पोलीस पथके फरार दाम्पत्याचा शोध घेत होती.

अखेर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक केली. आता या कथित बाळविक्री प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच व्यवहारामागे मोठे जाळे कार्यरत होते का, याचा तपास सुरू आहे. अटकेनंतर चौकशीत कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25

मैथिली ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या! तक्रार प्राप्त होताच प्रशासनाचा मोठा निर्णय; थेट कारवाईचे आदेश!

Thursday, 12 November 2026, 22:05

उरुळी कांचन-आष्टापूर रस्त्यावर उभ्या ऊस ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक ; उरुळी कांचन जवळील तरुणाचा जागीच मृत्यू..

Thursday, 12 November 2026, 21:51

तलाठ्यासह स्वतःसाठी मागितली लाच; 7/12 च्या नोंदीसाठी 20 हजारांचा सौदा, महिला अधिकारी ACBच्या ताब्यात!

Thursday, 12 November 2026, 20:33

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी घातले लक्ष, सर्वच पक्षीय मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Thursday, 12 November 2026, 20:22
Next Post

पुणेकरांसाठी ५०० रुपयांत एसी ई-बस पर्यटन सेवा; १५ विशेष मार्गांवर धावणार बस!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp