Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड पोलिसांची मोठी कारवाई; विनापरवाना ५६ गॅस सिलेंडरसह सुपर कॅरी नाकाबंदीत जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 27 June 2026, 15:41

दौंड, ता. २७ : दौंड पोलिसांनी मध्यरात्रीच्या नाकाबंदीदरम्यान मोठी कारवाई करत विनापरवाना घरगुती व व्यावसायिक वापराचे ५६ भरलेले गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या सुपर कॅरी वाहनासह सुमारे ५ लाख ४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पांडुरंग नरळे (बकल नं. २८८७, दौंड पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. तर चंद्रशेखर शंकरराव चव्हाण (वय ३५, रा. मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी रात्री ११ ते २६ जून रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत नगरमोरी चौक येथे नाकाबंदी सुरू होती. रात्री सुमारे १२.०५ वाजता अहिल्यानगरकडून दौंडकडे येणारी मारुती सुझुकी सुपर कॅरी (एमएच-१२ एक्सएम-६३१४) पोलिसांनी संशयावरून थांबवली.

वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये घरगुती व व्यावसायिक वापराचे एकूण ५६ भरलेले गॅस सिलेंडर आढळून आले. चालकाकडे गॅस सिलेंडर वाहतूक व वितरणाचा कोणताही वैध परवाना नव्हता. तसेच सिलेंडर कुठून आणले आणि कोणत्या वितरकाकडून घेतले, याबाबतही तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही.

 

यानंतर वाहन दौंड पोलीस ठाण्यात आणून पुरवठा निरीक्षकांकडून पंचनामा करण्यात आला. तपासात विनापरवाना गॅस सिलेंडरची साठवणूक व विक्रीसाठी वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान एचपी कंपनीचे ५ किलोचे ६ सिलेंडर, भारत गॅसचे १९ किलोचे २ सिलेंडर, भारत गॅसचे १४ किलोचे ६ सिलेंडर, कॅप्सॉन कंपनीचे ४ किलोचे ४२ सिलेंडर तसेच सुपर कॅरी वाहन असा एकूण ५ लाख ४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी चंद्रशेखर शंकरराव चव्हाण याच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ मधील कलम ३ व ७ तसेच Liquefied Petroleum Gas (Regulation of Supply and Distribution) Order, 2000 मधील कलम ३ अन्वये दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57

“साहेब त्या दोघांना पकडा” पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्…

Friday, 24 July 2026, 17:18

तळीरामांनो पार्टीचा प्लॅन रद्द करा! शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात कडक ‘ड्राय डे’ जाहीर

Friday, 24 July 2026, 16:44

तुकाराम मुंढेंचा दणका! पुण्यातील १२ हॉटेल-बेकरींचे परवाने तडकाफडकी निलंबित; ३ लाखांचा माल जप्त

Friday, 24 July 2026, 16:07

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश…

Friday, 24 July 2026, 16:01

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसमधून तब्बल सव्वा 7 लाखांचे दागिने लंपास; दौंड तालुक्यातील हॉटेलवरील घटना, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 24 July 2026, 15:41
Next Post

काय रे, तुला मराठी वाचता येत नाही? 11 वर्षीय मुलाला गजाला बांधून बेदम मारहाण, सावत्र आईसह तिघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.