Loni Kalbhor News : लोणी काळभोर : लग्नाच्या आमिषाने १९ वर्षीय तरुणीला पळवून नेले. तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर मात्र लग्नास नकार दिला. या प्रकाराचा धक्का बसल्याने संबंधित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार २४ नोव्हेंबर रोजी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उरुळी देवाची परिसरातील धनगर वस्ती येथे घडला.
प्रतीक्षा दत्तात्रय भगत (वय १९) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आदित्य अशोक जाधव (रा. राजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे) याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. Loni Kalbhor
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत तरुणी आणि आरोपी आदित्य दोघे एकाच गावात राहण्यास आहेत. आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून राहत्या घरातून पळवून नेले. तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ऐनवेळी लग्न करण्यास नकार देऊन, ‘तुला काय करायचे ते कर किंवा कुठेही जाऊन मर, मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही’, असे सांगितले. या संपूर्ण प्रकाराचा मुलीला प्रचंड मानसिक त्रास झाल्याने, तिने मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. Loni Kalbhor