Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor: लोणी काळभोर येथे जास्त भाड्यावरून ‘रॅपिडो’ चालकाचा राडा, महिलेच्या पोटात लाथ मारत कुटुंबीयांवर हल्ला

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 13 April 2026, 16:30

लोणी काळभोर, ता. 13 : जास्त भाडे आकारण्यावरून (Loni Kalbhor) झालेल्या वादातून कॅब चालकाने थेट प्रवाशांच्या कुटुंबावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात 5 एप्रिल रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकारात महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली असून तिच्या पती व भावालाही दगडाने मारून गंभीर जखमी करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी कॅब चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सरस्वती मल्लेश चलवादी (वय 29, रा. साई सृष्टी अपार्टमेंट, लोणी काळभोर) यांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक आले होते. त्यानंतर रात्री सुमारे 9.40 वाजता त्यांची बहीण मनिषा हिने ‘रॅपिडो’ अॅपद्वारे कॅब बुक केली. काही वेळातच संबंधित कॅब (MH12YB3584) त्यांच्या सोसायटीत आली. मात्र, अॅपवर दाखवलेल्या 271 रुपयांऐवजी चालकाने 475 रुपये भाडे मागितल्याने वाद झाला. त्यामुळे त्यांनी ती कॅब रद्द करून दुसरी कॅब बुक केली.

पहिला कॅब चालक संतप्त होऊन सोसायटी गेटजवळच थांबून राहिला. दुसरी कॅब आल्यानंतर त्याने त्या चालकाला बुकिंग रद्द करण्यास सांगत वाद घातला. यावेळी सरस्वती यांच्या पतीने “तुमचे बुकिंग रद्द केले आहे, तुम्ही जाऊ शकता,” असे सांगितल्यावर आरोपीने संतापून शिवीगाळ करत थेट त्यांच्यावर धाव घेतली.

वाद वाढत असताना सरस्वती यांनी मध्ये पडून तो सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांना शिवीगाळ करत पोटात लाथ मारली. त्यानंतर त्याने वैष्णवीच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी सरस्वतींचे पती व भाऊ यशवंत यांनी हस्तक्षेप केला असता, आरोपीने दगड उचलून यशवंत यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात यशवंत गंभीर जखमी झाले, तर पती धवल यांच्या हातालाही दगड लागून फ्रॅक्चर झाले.

या घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले; मात्र आरोपी तेथून पसार झाला. जखमींना तत्काळ विश्वराज व शिवम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपी कॅब चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 125(a), 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:15
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07
Next Post

Loni Kalbhor: “तू बीड-बार्शीतला आहेस, तुला काय भरपाई देऊ?” असे म्हणत थेऊर फाटा चौकात एकाला बेदम मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.