Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर पोलिसांनी केली पूरग्रस्तांची दिवाळी गोड, थेऊर येथील 28 कुटुंबांना शिधावाटप करून समाजासमोर निर्माण केला नवा आदर्श

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 19 October 2025, 13:10

लोणी काळभोर, ता. 19 : प्रशासनात काम करताना, गोरगरीब व पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असतो. काम करीत असताना कधी कधी चढउताराचा सामनादेखील करावा लागत असतो. परंतु, या समाजात काम करीत असताना, समाजासाठीही आपण काही तरी देणे लागतो. या भावनेतून आपणही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे. अशी सामाजिक बांधिलकी जपत आपण त्यांची दिवाळी गोड केली पाहिजे. असे प्रतिपादन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे.

थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रुके वस्ती येथील 28 पूरग्रस्त कुटुंबांना लोणी काळभोर पोलिसांकडून दिवाळीचा शिधा व मिठाई शनिवारी (ता.18) वाटप करण्यात आला. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन राजेंद्र पन्हाळे यांनी केले. यावेळी प्रिंट व डिजिटल मिडियाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब काळभोर, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार, विजय जाधव, रवी आहेर, संदीप जोगदंड, महेश चव्हाण, मंगेश नानापुरे, पोलीस अंमलदार संदीप धुमाळ, बापू वाघमोडे, थेऊरच्या पोलीस पाटील रेश्मा कांबळे, कुमार जोगदंड व पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना राजेंद्र पन्हाळे म्हणाले की, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या अगोदरच एक दिवसाचे वेतन सर्व पोलीस बांधवांनी दिलेले आहे. शासनाने शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. परंतु, अजूनही काही कुटुंबांचे संसार उघड्यावरच आहेत. आपल्याही रुके वस्ती येथील नागरिकांनासुद्धा पुराचा मोठा फटका बसला असून अजूनही त्यांचे जनजीवन विस्कळीत आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला होता.  त्यानुसार पूरग्रस्तांना मदत केली आहे.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात थेऊर येथे ढग फुटी सदृश्य पाऊस पडला होता. यावेळी शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. आपत्तीग्रस्त नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून स्वखुशीने वर्गणी गोळा केली.  या जमा झालेल्या रकमेतून शिधा व मिठाई खरेदी करण्यात आली.  दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्याचे पूरग्रस्तांना वाटप करण्यात आले. यावेळी पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

लोणी काळभोर पोलिसांचे होतेय सर्वत्र कौतुक

लोणी काळभोर पोलिस हे पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांनी कर्तव्याची सांगड सामाजिक उपक्रमाशी जोडली आहे. रुके वस्ती येथील 28 पूरग्रस्त कुटुंबांना शिधवाटप करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पुणे शहर पोलीस दलात पोलिसांकडून राबविलेला हा पहिला उपक्रम आहे. लोणी काळभोर पोलिसांच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21

राजगड पोलिसांची कामगिरी; चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत!

Sunday, 29 November 2026, 12:11
Next Post

खळबळजनक! गुंड नीलेश घायवळकडे सापडली लष्कराच्या शस्त्रागारातील 'ही' धक्कादायक वस्तू; पुणे पोलिस थक्क

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp