Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: दावणीला बांधलेल्या वासरावर बिबट्याचा हल्ला; लोणी काळभोर येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 31 December 2025, 11:57

लोणी काळभोर, ता. 31: गोठ्यात दावणीला बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बाजार मळा परिसरात घडली असून बुधवारी (ता. 31) सकाळी उघडकीस आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे 50 हजाराहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. तर बिबट्याचा लोणी काळभोर परिसरात वावर असल्याचे आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अमृत विठ्ठल काळभोर असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नावे आहे. अमृत काळभोर हे एक शेतकरी असून ते कुटुंबासोबत लोणी काळभोर परिसरात राहतात. त्यांचा बाजारमळा जिल्हा परिषद शाळेच्या जवळ गायींचा गोठा आहे. काळभोर यांनी नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री गोठ्यात जनावरे बांधली होती. रात्री दहा वाजता काळभोर कामे आटोपून घरी गेले होते.

दरम्यान, मंगळवारी (ता. 30) बिबट्याने सहा फुट भिंतीवरून गोठ्यात प्रवेश करून दावणीला बांधलेल्या वासरावर हल्ला केला. परंतु, रस्सी न तुटल्याने बिबट्याला वासरू घेऊन जाता आले नाही. पण या हल्ल्यात वासरू जाग्यावरच मृत्युमुखी पडले.   काळभोर हे बुधवारी सकाळी गोठ्यात गेले तेव्हा त्यांना वासरू मृतअवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल महेंद्र अगळे व तुळशीदास जाधव हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेची माहिती त्वरित वनविभागाला दिली आहे.

 

बिबट्याचे पायांचे ठसे नागरिकांना आढळून आले आहेत. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यातच या वासराचा मृत्यू झाला आहे. अशी नागरिकांना खात्री पटली आहे. आपल्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21

हनीमून मर्डर मिस्ट्रीत मोठा ट्विस्ट! पतीचा काटा काढणाऱ्या सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Thursday, 23 July 2026, 18:43

सहाय्यक अभियंत्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक! महावितरण कार्यालयात खळबळ

Thursday, 23 July 2026, 18:05

एक चप्पल अन् माती घसरल्याच्या खुणा… नाणेघाटात पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

Thursday, 23 July 2026, 17:13
Krushi Nidhi

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! कर्जमाफीची पहिली यादी आली; ‘ही’ अट पूर्ण नसेल तर लाभ हुकणार

Thursday, 23 July 2026, 16:48
Next Post

पुण्यात महायुतीचा खेळ खल्लास? 15 जागांवरून चर्चा फिस्कटली अन् शिंदेंनी डावच उलटवला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.