लोणी काळभोर, ता. 17 : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रामा कृषी रसायन (Loni Kalbhor News) लिमिटेड कंपनीत काम करणाऱ्या कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रामा कृषी रसायन कंपनी मॅनेजमेंट व रमाकृषी कामगार युनियन यांच्या मध्ये त्रैमासिक करार नुकताच झाला आहे. या करारानुसार सन 2024 ते 2027 या तीन वर्षासाठी कामगारांना प्रतिमाह 15 हजार 201 रुपये पगारवाढ झाली आहे.
रामा कृषी कंपनीच्या मॅनेजमेंटच्या वतीने जनरल मॅनेजर व्ही के पांडे, पर्सनल मॅनेजर आर. एन शर्मा, भंडारी तर युनियनच्यावतीने युनियनचे अध्यक्ष राजीव काळभोर, सचिव दत्तात्रय काळे, उपाध्यक्ष आकाश गरगडे,दत्तात्रय वारघडे, दत्तात्रय सुक्रे, गजानन जाधव यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत वरील निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. आणि या करारावर स्वाक्षरी करून मंजूर करण्यात आला. आता कामगारांना प्रतिमाह भरघोस पगारवाढ झाल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.








