Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : कुंजीरवाडीत रस्ता अडवून शिवीगाळ, मुलाच्या बोटाला चावा, दगडफेकीत महिला जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 9 May 2026, 17:16

Loni Kalbhor News लोणी काळभोर, ता. ९ : तुळजापूर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या एका कुटुंबावर शेजारी राहणाऱ्या महिलेने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सार्वजनिक रस्ता अडवून शिवीगाळ, मारहाण, दगडफेक आणि मुलाच्या हाताच्या बोटाला चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. हि घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) परिसरात गुरुवारी ७ मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. Loni Kalbhor News

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा पालवे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.या प्रकरणी लक्ष्मी बावणे (वय ५५, व्यवसाय – गृहिणी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावणे कुटुंब कुंजीरवाडी येथील रॉयल लॉन्स परिसरात वास्तव्यास आहे. ७ मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संपूर्ण कुटुंब तुळजापूर येथे देवदर्शनासाठी रिक्षाने निघाले होते. त्यावेळी घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर उभ्या असलेल्या आशा पालवे यांना बाजूला होण्यास सांगितल्यावर वादाची ठिणगी पडली. Loni Kalbhor News

आशा पालवे यांनी सुरुवातीला लक्ष्मी बावणे यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर वाद वाढताच संतोष बावणे हे रिक्षातून खाली उतरले. त्यावेळी आरोपी महिलेने त्यांनाही शिवीगाळ करत त्यांच्या उजव्या हाताच्या करंगळीशेजारील बोटाला जोरात चावा घेतला. या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. दरम्यान, लक्ष्मी बावणे आणि त्यांच्या सुनेने आशा पालवे यांना आवरण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी जोरात हिसका देत स्वतःची सुटका करून घेतली आणि रस्त्यावर पडलेले दगड उचलून बावणे कुटुंबाच्या दिशेने फेकण्यास सुरुवात केली. Loni Kalbhor News

दरम्यान, या दगडफेकीत लक्ष्मी बावणे यांच्या छातीच्या उजव्या बाजूस तसेच डाव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली. तर संतोष बावणे यांच्या हाताला आणि गुडघ्यालाही दगड लागून जखम झाली. घटनेनंतर घाबरलेल्या बावणे कुटुंबीयांनी तातडीने लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले. ससून रुग्णालयात उपचार सुरू असतानाही आशा पालवे यांनी बावणे कुटुंबीयांना शिवीगाळ करत “सर्वांना जीवे मारून टाकेन,” अशी धमकी दिली आहे. Loni Kalbhor News

 

याप्रकरणी लक्ष्मी बावणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशा पालवे यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), १२६, ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कुंजीरवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अमेरिकेचा हल्ला अन् इराणचा पलटवार! होर्मुझमध्ये काय घडतंय? जगाच्या तेलपुरवठ्यावर संकटाची चाहूल

Monday, 31 August 2026, 11:15

वाकडमध्ये मद्यपी कारचालकाचा हायव्होल्टेज राडा! पोलिसांनाच शिवीगाळ अन् दमदाटी, पाहा नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 10:55

1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांवर नवा नियम लागू! सिलेंडरच्या किमतीपासून e-KYC पर्यंत मोठे बदल; जाणून घ्या ………

Monday, 31 August 2026, 10:34

अंगावर खाकी, मनात जिद्द… पण पतीच्या जाचापुढे हरली! बारामती महिला पोलिसांन उचललं टोकाचं पाऊल

Monday, 31 August 2026, 10:11

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, 10जण जखमी

Monday, 31 August 2026, 9:52

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36
Next Post

Loni Kalbhor : फुलांच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला! शेतकऱ्याच्या गाडीतून दिवसाढवळ्या दोन लाखांची रोकड लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp