Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BIG BREAKING NEWS: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाईफेक; पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी, लोणी काळभोरमध्ये १४ जणांवर गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 9 May 2026, 14:57

BIG BREAKING NEWS लोणी काळभोर, ता. ९ : “आमच्या गुरुच्या अपमानाचा बदला घेणार? याच दोन पिस्टलने तुला संपवून टाकू,” अशी धमकी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ शनिवारी (ता. ९) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.BIG BREAKING NEWS

संग्राम भंडारे व अक्षय कांचन (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) तसेच इतर १० ते १२ जणांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विकास लवांडे (वय ५४, व्यवसाय – प्रवचनकार, रा. शिंदे वस्ती, पो. आष्टापूर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास लवांडे हे दशक्रीया कार्यक्रमासाठी शनिवारी सकाळी आळंदी म्हातोबाची येथे आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते माघारी निघाले होते.म्हातोबाची आळंदी येथील स्मशानभूमीजवळ फिर्यादी विकास लवांडे यांच्या चारचाकी गाडीला (क्र. एमएच १२ एक्सएक्स ०५६९) पांढऱ्या रंगाच्या हायरायडर (क्र. एमएच १४ एमक्यू २८५६) तसेच इतर दोन पांढऱ्या रंगाच्या बलेनो गाड्यांनी ओव्हरटेक करून अडवले. त्यानंतर हायरायडर गाडीतून उतरलेल्या दोन इसमांनी विकास लवांडे यांच्याजवळ जाऊन पिस्टलचा धाक दाखवत त्यांना जबरदस्तीने गाडीतून बाहेर ओढले.BIG BREAKING NEWS

त्यानंतर संग्राम भंडारे, अक्षय कांचन तसेच इतर १० ते १२ जणांनी लवांडे आणि त्यांचे चालक संतोष गडदे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. “तुला आम्ही जिवंत सोडणार नाही. याच दोन पिस्टलने तुला संपवून टाकू. आमच्या गुरुच्या अपमानाचा बदला घेणार,” अशी धमकी आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी विकास लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संग्राम भंडारे, अक्षय कांचन व इतर १० ते १२ जणांविरोधात भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 127(2),189(2), 191(2),190,115(2),351(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. BIG BREAKING NEWS

 

याबाबत बोलताना विकास लवांडे म्हणाले, “वारकरी संप्रदायातील कथित ‘२० घुसखोरांची’ नावे मी जाहीर केली होती. तेव्हापासून मला फोनवरून धमक्या येत आहेत. मी महाराष्ट्रभर फिरून प्रवचन करत असतो. बजरंग दल आणि गोरक्षकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. पोलिसांनी मला संरक्षण द्यावे. तसेच या गुन्ह्यातील आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मी आंदोलन सुरू ठेवणार आहे.

” दरम्यान, या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाला असून, राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रोहित पवार हे आज दुपारी लोणी काळभोर येथे येऊन लवांडे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. BIG BREAKING NEWS

विकास लवांडेंचे पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन
विकास लवांडे यांनी या घटनेची तीव्र नाराजी व्यक्त करत लोणी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. यावेळी संग्राम भंडारे, अक्षय कांचन व त्यांच्या सहकाऱ्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. जोपर्यत आरोपींना अटक केली जाणार नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. असा इशाराही विकास लवांडें यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.

संग्राम भंडारे यांच्याकडून एक व्हिडीओ शेअर
विकास लवांडे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गुरुवर्यांनी मला हिंदू धर्माची शिकवण दिली, आम्हाला लहानाचं मोठं केलं, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करत असेल तर, त्यांना घुसखोर आणि धर्मांध म्हणत असेल तर आम्ही ते कसं सहन करु. “आमच्या गुरुवर्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. निषेध म्हणून आम्ही त्यांच्यावर काळी शाई फेकली. मात्र पिस्तुल दाखविल्याचे आरोप खोटे आहेत,” असे भंडारे यांनी म्हटले आहे. तसेच, “यापुढेही गुरुवर्यांचा अपमान केल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना
या घटनेची माहिती मिळताच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,म्हणून पोलीस उपायुक्त सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले व पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, सोमनाथ नाळे,अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. BIG BREAKING NEWS

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post
two people detained for taking bribe in parbhnai

Khed Bribe News : वारसनोंदीसाठी ५५०० रुपयांची लाच घेताना तलाठी-कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.