Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बिबट्याने पुन्हा घेतला निष्पाप जीव! पिंपळसूटीत पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

योगेश मारणेby योगेश मारणे
Wednesday, 22 July 2026, 9:55

न्हावरे: शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी (फलके मळा) येथे बुधवारी (२२ जुलै) मध्यरात्री सुमारे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घरालगतच्या गोठ्यात आई-वडिलांसोबत झोपलेल्या पाच वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून तिला उचलून नेल्याची हृदयद्रावक घटना घडली.या हल्ल्यात भाग्यश्री संदीप वारे (वय ५, मूळ रा. पाथर्डी, जि.अहिल्यानगर) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेमुळे पिंपळसूटीसह संपूर्ण शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वारे कुटुंब पिंपळसूटी येथील मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या शेतावर मजुरीचे काम करत असून ते रात्री गोठ्यात झोपले होते.पहाटेच्या सुमारास भाग्यश्रीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिचे आई-वडील जागे झाले.त्यावेळी बिबट्या तिला फरफटत उसाच्या शेताकडे घेऊन जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यांनी आरडाओरडा केला. मात्र बिबट्या चिमुकलीला घेऊन अंधारात पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.घरापासून सुमारे ५० मीटर अंतरावरील उसाच्या शेतात भाग्यश्रीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

 

पिंपळसूटी परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत. पशुधनांवरील हल्ल्यांसह मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.यापूर्वीही याच परिसरात रक्षा अजय निकम(वय ४)या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.पुन्हा अशाच प्रकारे एका निष्पाप बालिकेचा बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.

या भागात तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे,व्यापक सर्च ऑपरेशन राबवावे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात,अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी वन विभाग आणि शासनाकडे केली आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिल्लीत तणाव वाढला! आंदोलनांमुळे बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल,16 मेट्रो स्टेशनही बंद

Wednesday, 22 July 2026, 13:15

“वेळ आली तर संपूर्ण मराठा समाज दिल्लीत येईल, आम्ही शांत बसणार नाही,” जंतरमंतरवर मनोज जरांगेंची गर्जना

Wednesday, 22 July 2026, 13:12

मोदी-पवार भेटीमागे नेमकं कारण काय? पडद्यामागे काय शिजतंय, वाचा सविस्तर माहिती

Wednesday, 22 July 2026, 12:48

“मला तुमच्यासोबत समलिंगी संबंध ठेवायचे आहेत”… बॉस ऑफिसमधील तरुणांवर टाकत होता दबाव; वरिष्ठ अधिकाऱ्याला जंगलात नेलं अन्…

Wednesday, 22 July 2026, 12:33

कांदा होणार महाग? पुढच्या 2 महिन्यांत टंचाईची शक्यता, शेतकरी नेत्याचा स्पष्ट इशारा

Wednesday, 22 July 2026, 12:27

जमीन द्या नाहीतर कारवाईला सामोरे जा! पुरंदर विमानतळासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा कठोर इशारा

Wednesday, 22 July 2026, 11:57
Next Post

CNG दरवाढीचा स्फोट! पुण्यात रिक्षा भाडं थेट दुप्पट होणार? प्रवाशांच्या खिशाला कात्री, किलोमीटरचा दर किती?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.