Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

असली-नकली तृतीयपंथीयांच्या वादामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न; शासनाने ओळखपत्र देण्याची गरज

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 22 June 2026, 17:50

पुणे, ता. २२ : गेल्या पंधरा दिवसांपासून सोशल मीडियावर तृतीयपंथीयांशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून, रेल्वे, सार्वजनिक ठिकाणे आणि बाजारपेठांमध्ये पैसे मागण्यावरून वाद, शिवीगाळ, अश्लील वर्तन तसेच असली आणि बोगस तृतीयपंथीयांमधील हाणामारीच्या घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी तर वाद इतके टोकाला गेले की कपडे फाटेपर्यंत मारामाऱ्या झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

तृतीयपंथी समाजातील काही प्रतिनिधींनी असा दावा केला आहे की, प्रत्यक्षात तृतीयपंथी म्हणून पूर्णवेळ जीवन जगणाऱ्या व्यक्तींची संख्या मर्यादित आहे. मात्र, काही जण स्वतःचे वैयक्तिक आयुष्य पुरुष म्हणून जगत असतानाही, विवाह करून कुटुंब सांभाळत असतानाही सार्वजनिक ठिकाणी तृतीयपंथी म्हणून वावरत असल्याने समाजात संभ्रम निर्माण होत आहे. अशा प्रकारांमुळे खऱ्या तृतीयपंथीयांची प्रतिमा डागाळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

पूर्वी एखाद्या व्यक्तीने स्वतःला तृतीयपंथी म्हणून घोषित केल्यानंतर त्याला त्या स्वरूपात स्वीकारले जात होते. मात्र, आता तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वैद्यकीय मंडळासमोर पडताळणी करावी लागते. संबंधित व्यक्तीची ओळख आणि स्थिती तपासल्यानंतरच अधिकृत प्रमाणपत्र दिले जाते. काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, अधिकृत ओळखपत्र आणि नोंदणी प्रक्रिया काटेकोरपणे राबविल्यास खरे तृतीयपंथी आणि त्यांचे नाव वापरून गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींमध्ये स्पष्ट फरक करता येईल. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारे वाद आणि गैरसमज कमी होण्यास मदत होऊ शकते.

 

दरम्यान, ट्रान्समेन किंवा पारंपरिक हिजडा-जोगता व्यवस्थेबाहेर स्वतंत्रपणे तृतीयपंथी म्हणून जीवन जगू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी सध्याची प्रमाणपत्र प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असल्याचीही भूमिका काहींकडून मांडली जात आहे. लिंगबदल शस्त्रक्रिया, वैद्यकीय कागदपत्रे आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

बोगस व्यक्तींवर कारवाई, खऱ्या तृतीयपंथीयांना संरक्षणाची मागणी
काही व्यक्तींच्या गैरवर्तनामुळे संपूर्ण तृतीयपंथी समाजाला दोष देणे योग्य नाही. गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आणि दुसरीकडे खऱ्या तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करणे, या दोन्ही बाबींचा समतोल राखणे आवश्यक आहे. वाढत्या वादांच्या पार्श्वभूमीवर शासनाने अधिकृत ओळखपत्र व्यवस्था, नोंदणी प्रक्रिया आणि पडताळणी यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा “असली आणि बोगस तृतीयपंथी” हा वाद भविष्यात आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालयातील सर्व महसुली आदेशांची चौकशी करावी - माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.