Khed News : राजगुरुनगर, (पुणे) : मराठा आरक्षण आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांची राजगुरूनगर येथे शुक्रवारी (ता. २०)जाहीर सभा होणार असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
राजगुरूनगर येथे जाहीर सभा
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या १ ऑक्टोबर पासून राजगुरूनगर येथे बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे.
दरम्यान, खेडच्या या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी मनोज जरांगे पाटील भेट देऊन येथे आयोजित सभेला संबोधीत करणार आहेत.