Friday, June 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Khed News: ‘मी औषध विभागाकडून आलोय’ सांगत मेडिकलची तपासणी अन् २० हजारांची मागणी; तोतया निरीक्षकाला पोलिसांची ‘सिनेस्टाइल’ अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 23 December 2025, 19:56
Khed News: 'I am from the drug department' demanding medical examination and Rs 20,000; Police arrest impersonator in 'scene style'

पुणे: खेड तालुक्यात अन्न (Khed News) आणि औषधे विभागाचा निरीक्षक असल्याचे (Pune Crime) भासवून मेडिकल दुकानाची तपासणी करणाऱ्या आणि नसलेले दोष दाखवून 20 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया निरीक्षकाला खेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी 23 डिसेंबर रोजी मेडिकल संघटनेच्या सदस्य आणि दुकानदारांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून राजगुरुनगर शहरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

20 हजार रुपयांची मागणी

आकाश कोंडुसकर (मूळ नाव आनंद भुजंग, वय 34, रा. सांगवी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या तोतया निरीक्षकाचे नाव आहे. राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आवाराबाहेरील भवानी मेडिकलमध्ये हा व्यक्ती आला होता. त्याने स्वतःला अन्न आणि औषध प्रशासनाचा वरिष्ठ निरीक्षक असल्याचे सांगून मेडिकल दुकानाची तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान त्याने विविध त्रुटी दाखवून त्या दुरुस्त न केल्यास कारवाई होईल, अशी भीती घालून 20 हजार रुपयांची मागणी केली.

ओळखपत्र पाहण्याची मागणी

मेडिकल चालक तरुण चौधरी यांना संशय आल्याने त्यांनी त्या व्यक्तीकडे ओळखपत्र पाहण्याची मागणी केली. ओळखपत्र पाहिल्यानंतर त्यावरील नाव आणि तपशील नेहमी येणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा वेगळे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी बाजूला जाऊन मेडिकल संघटनेतील राजू चौधरी, निलेश आरबुज आणि इतर सदस्यांना याबाबत माहिती दिली.

 

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधला. चौकशीत अशा नावाचा कोणताही अधिकारी विभागात नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित व्यक्तीला थांबवून ठेवण्याचे सांगण्यात आले. मात्र संशय वाढल्याने तोतया निरीक्षक नाष्टा करून येतो, असे सांगून तेथून निसटला.

संघटनेच्या सदस्यांनी त्याचा पाठलाग केला असता तो एका सीएनजी पंपावर आपल्या वॅगन आर वाहनात गॅस भरत असल्याचे दिसून आले. सर्वांनी त्याला घेरून प्रश्न विचारल्यावर तो गडबडला. पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच मेडिकल संघटनेच्या सदस्यांनी त्याला खेड पोलीस ठाण्यात नेले.

या प्रकरणी तोतयागिरी करून फसवणूक केल्याप्रकरणी आकाश कोंडुसकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा; सरकारने एलपीजी पुरवठ्यावरील निर्बंध हटवले

Thursday, 25 June 2026, 22:58

उसाच्या शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न; प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

Thursday, 25 June 2026, 22:34

चिमुकल्याच्या चेहऱ्यावर, नाकावर, ओठांवर मारहाणीच्या खुणा; अंगावर ठिकठिकाणी चावल्याच्या जखमा; प्री स्कुलमध्ये चिमुकल्यासोबत काय घडलं?

Thursday, 25 June 2026, 22:10

हातात झाडू, मनात शिस्त, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा आदर्श उपक्रम

Thursday, 25 June 2026, 21:34

पोलीस ठाण्यातच पोलीस शिपायाला किस करणं पडलं महागात! तात्काळ निलंबनाचे आदेश; व्हायरल व्हिडीओने खळबळ..

Thursday, 25 June 2026, 21:27

मोठी बातमी! सिया गोयलच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका; तातडीने रुग्णालयात दाखल

Thursday, 25 June 2026, 20:38
Next Post
Lakshmi Andekar: Directly from jail to the municipal election arena? Lakshmi Andekar's fight for bail; Nana Peth heated up with the discussion of her candidacy

Lakshmi Andekar: जेलमधून थेट महापालिका निवडणुकीच्या रिंगणात? लक्ष्मी आंदेकरची जामिनासाठी धडपड; उमेदवारीच्या चर्चेने नाना पेठ तापलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.