Friday, June 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चिमुकल्याच्या चेहऱ्यावर, नाकावर, ओठांवर मारहाणीच्या खुणा; अंगावर ठिकठिकाणी चावल्याच्या जखमा; प्री स्कुलमध्ये चिमुकल्यासोबत काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 25 June 2026, 22:10

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील एका प्री-स्कूलमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अवघ्या 23 महिन्यांच्या चिमुकल्याला त्याच्याच वर्गातील दुसऱ्या बालकाने मारहाण करत पाठीवर तब्बल 17 ठिकाणी चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून शाळा व्यवस्थापनातील जबाबदार सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

माहितीनुसार, 22 जून रोजी शाळेतून घरी आल्यानंतर बालकाच्या चेहऱ्यावर, नाकावर, ओठांवर तसेच शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या. याबाबत शाळा प्रशासनाकडे विचारणा केली असता सुरुवातीला समाधानकारक उत्तर देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज देण्यासही टाळाटाळ करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

यानंतर समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन लहान मुलांमध्ये बराच वेळ झटापट सुरू असल्याचे दिसून येते. धक्कादायक बाब म्हणजे, या वेळी वर्गात कोणताही शिक्षक किंवा कर्मचारी तत्काळ हस्तक्षेप करताना दिसत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शाळेतील बालकांच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

या प्रकरणी बालकाच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी प्राचार्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, मालक, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र प्रमुख आणि इतर जबाबदार व्यक्तींविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही.

तपासादरम्यान संबंधित प्री-स्कूलकडे आवश्यक महापालिका परवानगी नसल्याची बाबही समोर आली असून शिक्षण विभागाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल करू नये यासाठी शाळा व्यवस्थापनाकडून 10 लाख रुपयांची ऑफर आणि तीन वर्षे मोफत शिक्षण देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचा तसेच धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेमुळे खासगी प्री-स्कूलमधील बालकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून पोलिस आणि शिक्षण विभागाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा; सरकारने एलपीजी पुरवठ्यावरील निर्बंध हटवले

Thursday, 25 June 2026, 22:58

उसाच्या शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न; प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

Thursday, 25 June 2026, 22:34

चिमुकल्याच्या चेहऱ्यावर, नाकावर, ओठांवर मारहाणीच्या खुणा; अंगावर ठिकठिकाणी चावल्याच्या जखमा; प्री स्कुलमध्ये चिमुकल्यासोबत काय घडलं?

Thursday, 25 June 2026, 22:10

हातात झाडू, मनात शिस्त, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा आदर्श उपक्रम

Thursday, 25 June 2026, 21:34

पोलीस ठाण्यातच पोलीस शिपायाला किस करणं पडलं महागात! तात्काळ निलंबनाचे आदेश; व्हायरल व्हिडीओने खळबळ..

Thursday, 25 June 2026, 21:27

मोठी बातमी! सिया गोयलच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका; तातडीने रुग्णालयात दाखल

Thursday, 25 June 2026, 20:38
Next Post

उसाच्या शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न; प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.