Saturday, June 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केडगाव ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटचा पर्दाफाश; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 3 June 2026, 19:15

यवत, (पुणे) : दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्भ जन्माला येण्यापूर्वीच त्याचा घात करणाऱ्या एका मोठ्या आणि हाय-प्रोफाइल ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

एका व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी केडगाव येथील मुख्य सूत्रधार आण्णासाहेब गिरी याला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणारी मशीन हस्तगत केली आहे. या रॅकेटची पाळेमुळे थेट वाघोली, केसनंद, उरुळी कांचन आणि भोर तालुक्यापर्यंत पसरली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आतापर्यंत 15 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवून दलालांच्या टोळीवर कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅकेटमधील सक्रिय दलाल अतुल अंकुश जाधव (रा. लोहगाव-वाघोली, पुणे), याला पोलिसांनी 24 मे 2026 रोजीच अटक केली. नरेंद्र साहेबाराव ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली) हा आरोपी आधीच वाघोली पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात सध्या न्यायालयीन कोठडीत असून, यवत पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत. मंदार सुरेश माळी (रा. किकवी, ता. भोर, जि. पुणे) व सुंदरम कदम (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे दोघे पाहिजे असलेला दलाल असून पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहेत.

गंभीर प्रकरणाची पाळेमुळे 14 मे 2026 रोजी समोर आली, जेव्हा मांजरी (पुणे) येथील डॉक्टर सचिन विठ्ठल गुजर यांना मोबाईलवर एक खळबळजनक व्हिडिओ प्राप्त झाला. या व्हिडिओमध्ये एक इसम अवैध रित्या, कोणतीही परवानगी नसताना, लपून-छपून एका महिलेची गर्भलिंग निदानाची तपासणी करत असल्याचे स्पष्ट दिसत होते.

डॉ. गुजर यांनी या व्हिडिओची सखोल खात्री केली असता, बेकायदेशीर तपासणी करणारा हा इसम आण्णासाहेब गिरी (रा. केडगाव, ता. दौंड, मूळ रा. हंगा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असल्याचे निष्पन्न झाले. महिलांच्या आरोग्याशी आणि कायद्याशी खेळणाऱ्या या रॅकेटविरुद्ध डॉ. गुजर यांनी स्वतः फिर्यादी होऊन 19 मे 2026 रोजी यवत पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल होताच यवत पोलिसांनी 20 मे रोजी मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याला तात्काळ अटक केली. न्यायालयात हजर केले असता, पोलिसांनी एकूण 13 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेतला. या तपासामध्ये आरोपी गिरी याने गुन्ह्यातील इतर साथीदार आणि एजंट्सची नावे उघड केली, ज्यावरून पोलिसांनी संपूर्ण रॅकेट उध्वस्त केले.

पोलिसांनी 24 मे रोजी साक्षीदाराकडून तो मूळ व्हिडिओ जप्त केला, ज्यामध्ये आरोपी अण्णासाहेब गिरी याने पंचांसमक्ष “व्हिडिओतील तपासणी मीच करत होतो,” अशी कबुली दिली आहे. एकापेक्षा जास्त आरोपींचा सहभाग असल्याने पोलिसांनी या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम 3(5) हे वाढीव कलम लावले. तसेच 30 मे रोजी, जन्माला येण्यापूर्वीच भ्रूणाचा घात करण्याचे बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी 91 हे वाढीव कलम जोडले आहे. पोलिसांनी आरोपी गिरी याच्याकडून गर्भलिंग निदान करणारी मुख्य मशीन जप्त केली आहे.

यवत पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 15 साक्षीदारांची कसून विचारपुस केली असून, त्यापैकी एका महत्त्वाच्या साक्षीदाराचा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 183 अन्वये थेट न्यायालयासमोर अधिकृत जबाब नोंदवला आहे. आरोपींनी या काळ्या धंद्यातून किती पैसे कमावले आणि कोणत्या डॉक्टरांशी किंवा रुग्णालयांशी त्यांचे लागेबांधे होते, हे शोधण्यासाठी पोलिसांनी सर्व आरोपींचे बँक स्टेटमेंट हस्तगत केले आहेत. तसेच त्यांच्या मोबाईल नंबरचे सीडीआर काढून तांत्रिक विश्लेषण सुरू आहे, ज्यामुळे अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेतलवाड करत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

काळेपडळ परिसरात मोठ्या गुन्ह्याचा कट उधळला; गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह त्रिकूट गजाआड

Friday, 5 June 2026, 23:00

इंदापुरात सोसाट्याच्या वादळाने नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटरचे पत्रे उडाले; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Friday, 5 June 2026, 22:56

कर्वेनगरमध्ये सोसायटीच्या 32 लाखांवर ‘डल्ला’; माजी प्रशासक आणि साथीदारावर गुन्हा दाखल

Friday, 5 June 2026, 22:29
Pune shaken! Three die in cylinder explosion; Family loses support including 'doer' man

पुणे हादरले! सिलेंडरच्या स्फोटात तिघांचा होरपळून मृत्यू; ‘कर्त्या’ पुरुषासह कुटुंबाचा आधार हरपला

Friday, 5 June 2026, 21:47

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

Friday, 5 June 2026, 21:43

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

Friday, 5 June 2026, 20:55
Next Post

निदा खानला लपवणारे इम्तियाज जलील हेच कटाचे सूत्रधार!" संजय शिरसाटांचा थेट आरोप; प्रकरणाला नवं वळण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.