उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर गांजा विक्री करणाऱ्या शिरूर येथील टोळीला जिल्हा ग्रामीण पोलिस दलाच्या कामशेत पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पोलिसांनी एका आलिशान गाडीसह तब्बल 57 लाखांचा मुद्देमाल गुरुवारी (ता. 22) जप्त केला आहे. अशी माहिती सहायक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिली. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
अभिषेक अनिल नागवडे (वय – 24), प्रदिप नारायण नामदास (वय 25), योगेश रमेश लगड, (वय- 32), वैभव संजीवन चेडे, वय -23, रा. सर्वजण. पी.एम. टी. सटॉप जवळील, मराठी शाळे जवळ, कारेगाव ता. शिरूर अशी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सहायक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्गवरून नेहमीच गांजासाह गुटख्याची कायम तस्करी सुरु असते. कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, जुन्या पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील ताजे (ता. मावळ) ग्रामपंचायत हद्दीतून लोणावळा या बाजूकडे एका सिल्वर रंगाच्या चारचाकी गाडीतून चौघेजण गांज्याची वाहतूक करणार आहेत.
सदरची माहिती पाटील यांनी वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार दोन पथके तयार केली. मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी सापळा रचला. एक सिल्वर रंगाची चारचाकी त्या ठिकाणी दिसून आली. यावेळी पथकातील पोलिसांनी कार थांबवून चौकशी करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, गाडीची डिक्की उघडली असता डिक्कीत 48 लाख 50 हजार रुपये किमतीचा गांजा मिळून आला. याप्रकरणी वरील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली 8 लाख रुपयांची चारचाकी गाडी 42 हजार रुपये किमतीचे 3 मोबाईल असा 56 लाख 92 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील हे करीत आहेत.
सदरची कामगिरी सहायक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा फौजदार नितेश कदम, पोलीस अंमलदार रविंद्र रावळ, जितेंद्र दिक्षित, समीर करे, रविंद्र राय, गणेश तावरे, प्रतिक काळे, गणेश ठाकुर, शिवाजी टकले, सचिन निंबाळकर, पवन डोईफोडे, होमगार्ड सुशिल लोखंडे, रामदास पोटफोडे यांनी कारवाई केली आहे.