विजय लोखंडे
वाघोली : वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील श्री संत तुकाराम शिक्षण संस्थेचे जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने यावर्षी दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. यामध्ये यावर्षी शैक्षणिक वर्ष सन 2023-2024 चा 10 वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागल्याने विद्यालयाचे कौतुक व यश संपादित केलेल्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचे अभिनंदन सर्व स्तरावर होत आहे.
या यशाबद्दल जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, कर्मचारी यांचे अभिनंदन श्री संत तुकाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ उर्फ अण्णासाहेब पठारे, संस्थेचे सचिव माजी आमदार बापूसाहेब पठारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुशाभाऊ गावडे, शाळा समितीचे अध्यक्ष विद्याधर गावडे, संस्थेच्या संचालिका लता गायकवाड, नगरसेवक महेंद्र पठारे, संचालक वैभव पठारे, वाडेबोल्हाईच्या सरपंच वैशाली केसवड, उपसरपंच मोनिका भोर यांनी केले.
या विद्यालयातून 10 वी बोर्डाच्या परीक्षेला 90 विद्यार्थी बसले होते. तर १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षेला कला शाखेत 46 विद्यार्थी, वाणिज्य शाखेत 65 तर विज्ञान शाखेत 44 विद्यार्थी बसले होते. यातील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 10 वी बोर्डाच्या परीक्षेत जोगेश्वरी माता माध्यमिक विद्यालयात प्रिती सदाशिव शेजवळ 93 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकवीला. तर ज्ञानेश्वरी संतोष सुतार 88 टक्के गुण मिळवत दुतीय, तर तनुजा अशोक ठाकर 81.40 टक्के मिळवत तृतीय क्रमांक पटकविला.
12 वी बोर्डाच्या परीक्षेत जोगेश्वरी माता उच्च माध्यमिक विद्यालयात कला शाखेमध्ये प्रथम क्रमांक दिव्या मल्हारी साळवे 83 टक्के, सुरज बाळू भोसले 77.67 टक्के मिळवत दुतीय, तर अपेक्षा शिंदे 76.50 टक्के मिळवत तृतीय, तर वाणिज्य शाखेत वैष्णवी गणपत गायकवाड 91.33 टक्के मिळवत प्रथम, क्रांती विनायक गावडे 89.50 टक्के मिळवत द्वितीय, तर शिवानी दगडू शितोळे 88.50 टक्के मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. तसेच विज्ञान शाखेमध्ये प्रथम प्रांजल प्रशांत शिंदे 80.83 टक्के, द्वितीय रितेश विठ्ठल कोतवाल 75.60 टक्के, तृतीय दीक्षा मुकुंद वाघमारे 74.83 टक्के अशा प्रमाणे यशस्वी टक्केवारी प्राप्त करीत यश मिळवले.
तसेच नागेश धरेप्पा माळी, सिद्धी अरविंद सातव व वैष्णवी गणपत गायकवाड या तीन विद्यार्थ्यांनी अकाउंटन्सी विषयात 100 टक्के गुण मिळवले त्याबद्दल विद्यार्थी व विषय शिक्षक शिवराज पवार यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
दहावी, बारावीचा विद्यालयाचा निकाल १०० टक्के लावण्यासाठी विशेतःहा सर्वच शिक्षकांनी मेहनत परिश्रम घेतले. त्याला खरी भक्कम साथ विद्यार्थ्यांनी दिली. यात प्राचार्य व शिक्षकांचे उत्कृष्ठ नियोजन, सातत्य पूर्ण जादा तासिका, सराव प्रश्नपत्रिका यामुळे १०० टक्के निकाल लागला आहे. यात १२ वीच्या अकाउंटन्सी या विषयांमध्ये तीन विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळालेले आहेत, त्याबद्दल अकाउंटन्सी विषय शिक्षक शिवराज पवार यांचे कौतुक परिसरातून होत आहे.
सतीश धुमाळ ,प्राचार्य-जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाडेबोल्हाई