Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात IT इंजिनिअरची 27व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; मृत्यूनंतर वडिलांना धमकीचा फोन, धक्कादायक कारण आलं समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 16 October 2026, 8:59

पुणे : डेटिंग ॲपच्या माध्यमातून झालेली ओळख एका तरुणासाठी त्रासदायक ठरल्याची धक्कादायक घटना पुण्यातील खराडी परिसरात समोर आली आहे. ड्रग्जच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची आणि बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. या त्रासामुळे 22 वर्षीय आयटी कर्मचाऱ्याने इमारतीच्या 27 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती आहे. याप्रकरणी अजयकुमार भाटिया याच्याविरोधात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मृत तरुणाचे नाव शिखर कुमार गौरव सक्सेना (वय 22) असे आहे. तो मूळचा उत्तराखंडचा रहिवासी होता. पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत तो काम करत होता. खराडी येथील रिव्हरडेल सुइट्स सोसायटीमध्ये तो राहत होता. त्याचे वडील उत्तराखंडमध्ये सरकारी नोकरी करतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेटिंग ॲपच्या माध्यमातून शिखरची एका व्यक्तीशी ओळख झाली होती. या व्यक्तीने त्याला ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तसेच त्याची बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे शिखर मानसिक तणावात होता. अखेर 1 ऑक्टोबर रोजी त्याने इमारतीवरून उडी मारली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.

शिखरच्या मृत्यूमागचे नेमके कारण सुरुवातीला स्पष्ट झाले नव्हते. कुटुंबीयांनी दुःखद वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र, त्यानंतर शिखरच्या वडिलांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यांच्या मुलाने बेकायदेशीर कृत्य केल्याचा दावा करत, पैसे न दिल्यास त्याची माहिती उघड करण्याची धमकी फोन करणाऱ्या व्यक्तीने दिल्याचे सांगितले जाते.

 

या प्रकारानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून, अजयकुमार भाटिया याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील धमक्या, पैशांची मागणी आणि आरोपीची भूमिका याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

माहूर घाटात भीषण अपघात! रेणुका मातेच्या दर्शनावरून परतताना टेम्पो दरीत कोसळला; 3 भाविकांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी

Friday, 16 October 2026, 10:05

डाळिंब येथे शिवीगाळ केली म्हणून गळा दाबून केला खून, हात-पाय दगडाला बांधून विहिरीत फेकलं; आरोपी अटकेत

Friday, 16 October 2026, 9:47

‘मुंबई क्राइम ब्रँच’चा फोन, अटकेची भीती अन् खात्यातील पैसे ट्रान्सफर! पुण्यात 76 वर्षीय महिलेला 1.69 कोटींचा गंडा

Friday, 16 October 2026, 9:35

पुण्यात नशेत विद्यार्थ्याचा धिंगाणा! भरधाव कारने 4 वाहनांना उडवलं; संतप्त शेकडो लोकांनी घेरलं अन्…

Friday, 16 October 2026, 9:28

सोन्या-चांदीच्या परताव्यात कपात! आता दागिने स्वस्त होणार का? वाचा

Friday, 16 October 2026, 9:15

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत; 2 बोगदे, मेट्रोसह नवा प्लॅन जाहीर!

Friday, 16 October 2026, 9:13
Next Post

बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी प्यायला लावलं! सौरव जोशीच्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp