Monday, August 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चाकणमधून 20 उद्योग जाणार असल्याची चर्चा खोटी? उदय सामंतांचा मोठा दावा; खड्डे, कोंडी अन् पायाभूत सुविधांसाठी केली मोठी घोषणा

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 17 August 2026, 13:29

पुणे : चाकण आणि तळेगाव औद्योगिक परिसरातील रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी, पार्किंग आणि भूसंपादनाच्या प्रश्नांवर सरकारने ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 10 महिन्यांत उद्योजकांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण येथे केली.

उद्योजक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी दर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘उद्योग दरबार’ आयोजित केला जाणार आहे. तसेच उद्योगमंत्री दर 2 महिन्यांनी जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरातील समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.

चाकणमधून 20 मोठे उद्योग बाहेर जाणार असल्याच्या चर्चेवरही सामंत यांनी स्पष्टीकरण दिले. चाकणमधील उद्योग स्थलांतराबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. उलट, गेल्या 3 ते 4 वर्षांत परिसरातील उद्योगांमध्ये दरवर्षी सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे उद्योजकांनी सांगितल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, चाकण-तळेगाव-शिक्रापूर औद्योगिक पट्ट्यातील रस्ते, वाहतूक, कचरा, प्रदूषण, पाणी आणि वीज यांसारख्या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली. महिंद्रा कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी भूसंपादनात अडथळा ठरणाऱ्या 4 शेतकऱ्यांबाबत सक्तीच्या भूसंपादनाचा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही औद्योगिक परिसरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश दिले. पावसाळ्यात पारंपरिक पद्धतीने रस्ते दुरुस्त करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता प्री-कास्ट आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅचसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चाकण, रांजणगाव आणि तळेगाव परिसरातील रस्त्यांसाठी गेल्या वर्षभरात 410 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित 14 किलोमीटर रस्त्यांच्या कामांचे नियोजनही करण्यात येणार आहे. याशिवाय कामगारांसाठी ‘क्लस्टर हाउसिंग’ उभारण्यासाठी एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून देण्याचे धोरण राबवले जाणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरएसपी ट्रूपची नेत्रदीपक परेड अन् कराटे प्रात्यक्षिकांनी जिंकली मने..

Monday, 17 August 2026, 16:59

पुण्यात धावत्या बसमध्येच प्रवाशासोबत घडलं भयंकर! क्षणात खाली कोसळला अन् १५ मिनिटांचा थरार….

Monday, 17 August 2026, 16:57

आलेगाव पागाच्या कष्टकरी कुटुंबातील युवकाचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ठरला प्रेरणादायी आदर्श

Monday, 17 August 2026, 16:52

उन्नती कन्या विद्यालयात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; ‘विकसित भारत’ थीम, धनुर्विद्या व कराटेच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष..

Monday, 17 August 2026, 16:47

भाजपने जाहीर केली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी! महाराष्ट्राचा ‘दबदबा’ कायम; संघटनेत मोठे फेरबदल….

Monday, 17 August 2026, 16:34

श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Monday, 17 August 2026, 16:07
Next Post

डोकेदुखी, नाकाचा त्रास अन् मानेचा कडकपणा... नस्यबद्दल आयुर्वेद काय सांगतो? जाणून घ्या फायदे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.