Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजपने जाहीर केली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी! महाराष्ट्राचा ‘दबदबा’ कायम; संघटनेत मोठे फेरबदल….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 17 August 2026, 16:34

नवी दिल्ली : आगामी लोकसभा आणि उत्तर प्रदेशसह विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली नवी राष्ट्रीय टीम जाहीर केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी जाहीर केलेल्या या नव्या कार्यकारिणीत प्रादेशिक समतोल, युवा आणि महिला नेतृत्वाला प्राधान्य देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील काही प्रमुख नेत्यांनाही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

विनोद तावडेंकडे राष्ट्रीय सरचिटणीसपद कायम

भाजपचे खासदार विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्री म्हणजेच सरचिटणीसपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर तावडेंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

महाराष्ट्रातून भारती पवार, पीयूष गोयल यांनाही जबाबदारी

नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील इतर नेत्यांनाही स्थान देण्यात आले आहे.

डॉ. भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सह-संयोजकपदी निवड करण्यात आली आहे.

 

स्मृती इराणींचे पक्ष संघटनेत पुनरागमन

लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणात काहीशा बाजूला पडलेल्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना भाजपच्या नव्या संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.

वसुंधरा राजेंनाही राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानमधील पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

बी. एल. संतोष यांच्याकडे संघटन महामंत्रीपद कायम

बी. एल. संतोष यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्री (संघटन) पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. राजेश मंगल यांची राष्ट्रीय सह-कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपच्या नव्या टीममध्ये १३ उपाध्यक्ष, ८ महामंत्री आणि १६ राष्ट्रीय मंत्री

भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय महामंत्री आणि १६ राष्ट्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता या राज्यातील अनेक नेत्यांना नव्या टीममध्ये स्थान देण्यात आले आहे.

सोशल मीडिया संघटनेतही बदल

भाजपच्या सोशल मीडिया विभागातही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सोशल मीडिया संयोजक अमित मालवीय यांना या जबाबदारीतून हटवण्यात आल्याची माहिती असून, त्यांच्या जागी दीपक मस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने राष्ट्रीय पातळीवर केलेल्या या नियुक्त्यांमधून संघटन मजबूत करण्यासोबतच विविध राज्यांमधील राजकीय आणि सामाजिक समीकरणांचा विचार करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Friday, 11 September 2026, 15:34

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15
Next Post

उन्नती कन्या विद्यालयात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; 'विकसित भारत' थीम, धनुर्विद्या व कराटेच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp