Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीची फसवणूक; दौंड येथील डॉक्टर दाम्पत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 9 September 2026, 11:13

दौंड, (पुणे): बनावट वैद्यकीय अहवाल दुसऱ्या डॉक्टरच्या नोंदणी क्रमांकाचा गैरवापर आणि संशयास्पद ओळखपत्रांच्या आधारे विमा कंपनीकडे वैद्यकीय खर्चाचा दावा सादर करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी डॉक्टर दाम्पत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जीवनरेखा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल दौंड येथे हा प्रकार 13 ते 19 जुलै 2024 घडला आहे.

डॉ. विशाल गोविंद मिसाळ, माधुरी विशाल मिसाळ आणि विमाधारक संकेत राजू होले असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक अभिजित मोरे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत होले यांनी जीवनरेखा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याचे दाखवून 13 ते 19 जुलै 2024 या कालावधीतील वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी विमा दावा दाखल केला होता. या दाव्याच्या नियमित पडताळणीदरम्यान विमा कंपनीला कागदपत्रांमध्ये संशयास्पद बाबी आढळून आल्या. त्यानंतर कंपनीने सखोल तपास केला असता कथित अफरातफर समोर आली.

दाव्यासोबत डॉ. माधुरी बहिरवाडे यांच्या नावाने पॅथॉलॉजी अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालावर त्यांचे नाव, वैद्यकीय पदवी, नोंदणी क्रमांक आणि स्वाक्षरीचा शिक्का असल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, संबंधित वैद्यकीय नोंदणी क्रमांकाची अधिकृत संकेतस्थळावर पडताळणी केली असता तो क्रमांक डॉ. माधुरी बहिरवाडे यांच्या नावावर नसल्याचे आढळले.

 

इतकेच नव्हे, तर अहवालावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तो दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच दावा अर्जासोबत सादर केलेल्या आधारकार्डावरील नाव व जन्मतारीख आणि अधिकृत वैद्यकीय नोंदणीतील नाव व जन्मतारखेतही तफावत आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सर्व बाबींवरून डॉक्टर नसतानाही बनावट वैद्यकीय कौन्सिल नोंदणी दाखवून, दुसऱ्या डॉक्टरच्या नोंदणी क्रमांकाचा वापर तसेच कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीचा विश्वास संपादन करून आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, डॉ. विशाल मिसाळ, माधुरी मिसाळ आणि संकेत होले यांनी संगनमत करून असत्य वैद्यकीय अहवाल, ओळखपत्रे व शिक्क्यांचा वापर करत विमा कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचा फिर्यादीचा आरोप आहे. संबंधित तिघांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून तपासअंमलदार अमीर शेख करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे घाटमाथा, कोकणासह ‘या’ ९ जिल्ह्यांत हवामान बदलणार; ऐन सणासुदीच्या काळात पावसाची शक्यता!

Tuesday, 20 October 2026, 21:51

‘हा पाकिस्तान, श्रीलंका नव्हे, घरात घुसून मारणारा भारत’; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Tuesday, 20 October 2026, 21:46

पिंपरी दुमाल्यात रावण दहनातून दुष्काळाच्या अंतासाठी आई जगदंबेला साकडे

Tuesday, 20 October 2026, 21:19

रावण दहनाने यवत येथे नवरात्र उत्सवाची सांगता; धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्सव उत्साहात साजरा

Tuesday, 20 October 2026, 21:15

उद्योजक राणा सूर्यवंशींवरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तिघे जेरबंद; कर्वेनगरमधून दोघे, तर भिगवण परिसरातून तिसरा आरोपी ताब्यात

Tuesday, 20 October 2026, 19:50

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पशुपालकांसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय; चारा बियाणे योजनेच्या अटी शिथिल

Tuesday, 20 October 2026, 19:44
Next Post

जरांगेंच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार? सरकारच्या शिष्टमंडळाची छत्रपती संभाजीनगरात तातडीची बैठक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp