Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर पोलीस स्टेशनसमोर खाजगी वाहनावर भारतीय राजचिन्ह, फक्त 500 रुपयांचा दंड आकारून कार सोडल्याने नागरिकांमध्ये संताप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 25 May 2026, 21:30

अक्षय टेमगिरे

शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनसमोरच एका खाजगी फोर व्हीलर वाहनावर भारतीय राजचिन्ह (अशोक स्तंभ) असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित वाहनावर कारवाई करण्यात आली. मात्र, केवळ 500 रुपयांचा दंड आकारून वाहन (एमएच 12 डब्ल्यू ई 1584) सोडून देण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी अधिकारी अथवा अधिकृत शासकीय वाहनांनाच भारतीय राजचिन्ह वापरण्याची परवानगी असते. मात्र, शिरूर पोलीस स्टेशनसमोरील परिसरात उभ्या असलेल्या एका खाजगी चारचाकी वाहनावर भारतीय राजचिन्ह लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहताच सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी तत्काळ पोलिसांना माहिती देत संबंधित वाहनावर कारवाईची मागणी केली.

 

यानंतर पोलिसांनी संबंधित वाहनाची पडताळणी करून दंडात्मक कारवाई केली. मात्र, केवळ 500 रुपयांचा दंड आकारून वाहन सोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खाजगी वाहनावर भारतीय राजचिन्ह लावणे हा गंभीर प्रकार असताना इतकी किरकोळ कारवाई का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

खाजगी वाहनांवर अशा प्रकारे भारतीय राजचिन्हाचा वापर केल्याने सामान्य नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता असते. काहीजण प्रभाव निर्माण करण्यासाठी किंवा स्वतःला अधिकृत व्यक्ती असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी अशा चिन्हांचा वापर करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार शिरूर पोलीस स्टेशनसमोरच घडल्याने नियमांच्या अंमलबजावणी बाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

पोलीस स्टेशनसमोरच नियमांना हरताळ फासला जात असेल, तर सामान्य ठिकाणी परिस्थिती काय असेल? अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केलीआहे.

दरम्यान, या घटनेनंतर शिरूर तालुक्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली असून, भारतीय राजचिन्हाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात पोलिस प्रशासनाने ठोस आणि कडक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा शिरूरचे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी व्यक्त केली जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली!जुलैचे 1500 रुपये कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

Wednesday, 29 July 2026, 23:20

‘तु मला खूप आवडते’ म्हणत पारगाव येथे दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग ; दोघांना अटक

Wednesday, 29 July 2026, 23:06

पार्थ पवार-कायनात दारा यांचा साखरपुडा संपन्न! साध्या सोहळ्यात जुळल्या आयुष्याच्या गाठी; ‘या’ दिवशी होणार विवाह

Wednesday, 29 July 2026, 22:40

पिंपरी दुमाला येथे महिला सुरक्षा आणि ग्रामसुरक्षेवर पोलिस प्रशासनाची विशेष बैठक

Wednesday, 29 July 2026, 21:13

‘लाडकी बहीण’ योजनेला धक्का? तब्बल 2000 महिलांनी लाभ घेण्यास दिला नकार,अधिकाऱ्यांकडे अर्जांचा पाऊस

Wednesday, 29 July 2026, 20:58

कोरोनाचा पुन्हा कहर! शेजारील देशात एका महिन्यात तब्बल 79 हजार रुग्ण, आरोग्य यंत्रणा अलर्ट

Wednesday, 29 July 2026, 20:15
Next Post

पुण्यात नशेसाठी इंजेक्शन विकणाऱ्या सराईत गुंडाला अटक; डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय तरुणाईच्या जिवाशी खेळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.