दीपक खिलारे
Indapur इंदापूर, (पुणे) : वडिलोपार्जित जमिनीमध्ये चक्क दोन्ही सुनांना वाटा देऊन भारतीय संस्कृतीपासून भरकटत चाललेल्या समाजापुढे आदर्श इंदापूर तालुक्यातील एका कुटुंबप्रमुखाने समाजासमोर ठेवला आहे.
भरकटत चाललेल्या समाजापुढे आदर्श…!
सुभाष मराडे (मराडेवाडी ता. इंदापूर) असे कुटुंबप्रमुखाचे नाव आहे. सोनाली सदाशिव मराडे आणि सिंधू भाऊ मराडे या दोन्ही सुनांना आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये वाटा दिला आहे. अॅड. अरुण गायकवाड आणि अॅड. महेश शिंदे यांच्या प्रयत्नांती ही किमया इंदापूर न्यायालयातील लोकन्यायालयात घडली आहे.
विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश पी. एल. पाटील, न्यायाधीश खाजा कलाल, न्यायाधीश स्वानंदी वडगावकर, न्यायाधीश शीतल साळुंखे व इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. नरेंद्र शहा यांच्या उपस्थितीत लोकअदालत पार पडली. यामध्ये अनेक घटना तडजोडीअंती निकाली काढण्यात आल्या. परंतु यामध्ये वरील घटना उल्लेखनीय ठरली.
दरम्यान, सुभाष मराडे यांनी आपल्या कुटुंबीयांच्या सहमतीने सोनाली सदाशिव मराडे आणि सिंधू भाऊ मराडे या दोन्ही सुनांना आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये वाटा दिला आहे. जिथे मुली आणि बहिणींचा हक्क सोडपत्राद्वारे अधिकार मारला जातो, तिथे सुनांना वाटा देऊन हक्क देणारे मराडे कुटुंबीय भविष्यात अनेकांसाठी आदर्श ठरणार आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Indapur News : हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सहकार महर्षी कारखान्याच्या बिनविरोध संचालकांचा सत्कार
Indapur : निमगाव केतकी येथील ईदगाह सुशोभीकरणासाठी 15 लाखाचा निधी : राजवर्धन पाटील