Monday, August 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचनमध्ये ‘ओपन जेवू देईना, अन् क्लोज झोपू देईना’; पोलिसांच्या छुप्या आशीर्वादाने अवैध धंदे जोरात?, उद्ध्वस्त होणाऱ्या संसारांकडे पोलीस यंत्रणेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 3 August 2026, 17:28

उरुळी कांचन (पुणे) : ‘ओपन जेवू देईना आणि क्लोज झोपू देईना…’ हे जुने वाक्य सध्या उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तंतोतंत खरे ठरताना दिसत आहे. उरुळी कांचन आणि परिसरात सध्या मटक्याचा जुगार खुलेआम सुरू असून, पोलिसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे या अवैध धंद्याला अक्षरशः उधाण आले आहे. मटक्याच्या चिठ्ठ्या उघड-उघड हाती लागत असतानाही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने, “हे दुकान पोलिसांच्याच पाठिंब्याने चालले आहे का?” असा संतापजनक सवाल आता नागरिक विचारत आहेत.

कालपर्यंत फुटकळ असलेले मटका एजंट आणि मालक आज लाखोपती झाले आहेत. सामान्यांना ‘ओपन-क्लोज’च्या जाळ्यात ओढून त्यांचे खिसे रिकामे करणे आणि स्वतःचे खिसे भरणे, हाच यांचा एककलमी कार्यक्रम बनला आहे. आकडेमोडीच्या या नादात शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक जण घरातील दागदागिने विकून कर्जबाजारी झाले आहेत. या जीवघेण्या सवयीच्या जाळ्यात तरुण मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच अडकले आहेत.

समाजात नैतिकदृष्ट्या शून्य किंमत असलेले हे गुन्हेगार आज हप्त्यांच्या जोरावर संपूर्ण यंत्रणेला खिशात घालून फिरत आहेत. पोलिसांना इच्छा असेल तर या मटकामालकांना जेरीस आणण्यासाठी अवघा ‘एक तास’ पुरेसा आहे. परंतु, “मटका बंद झाला तर पोलिसांचा हप्ता बंद होईल,” या भीतीपोटीच पोलीस गप्प आहेत की काय, असा संशय बळावला आहे.

 

दरम्यान, उरुळी कांचन पोलिसांनी उरुळी कांचन हद्दीतील बाजार मैदान परिसरात शुक्रवारी (ता. 31) सायंकाळी तुटपुंजी कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. तर याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची ‘टेहळणी’ अन् केवळ देखावा..

मटकामालक, त्यांचे हस्तक आणि त्यांची संपूर्ण नस ना नस काही ठराविक पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना ठाऊक आहे. असे असूनही, एखाद्या ठिकाणी बातमी आली किंवा वरिष्ठ फिरणार असले, की त्या दिवशी पुरता व्यवहार बंद ठेवला जातो. पोलीस फक्त ‘टेहळणी’ करून निघून जातात आणि आपण फार सतर्क आहोत असा बनाव रचतात.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मामाने सोयरीक मोडल्याने डोकं सटकलं अन् सख्ख्या मामाच्याच बाळाचं अपहरण केलं; रिक्षातच बाळाला सोडून तरुण फरार…

Monday, 3 August 2026, 21:55

यवत पोलिसांची अवैध दारू व्यवसाय विरोधात धडक कारवाई; एकाच दिवशी ६ गुन्हे दाखल, एकूण ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

Monday, 3 August 2026, 21:08

पोलिसांनी रस्त्यावर धिंड काढली, भरचौकात उठाबशा काढायला लावल्या पण आता प्रकरण आलं अंगलट! सिनेस्टाइल कारवाई करणं भोवलं

Monday, 3 August 2026, 20:56

अन् चालत्या बसमध्येच दोनदा विनयभंग! एकट्या महिलेचा रात्री ट्रॅव्हल्समधून प्रवास, बस कर्मचाऱ्याची नियत फिरली आणि नको तिथे हात लावत…

Monday, 3 August 2026, 20:08

खासगी गाड्यांवर ‘पोलीस’ लिहिलंय का? तर मग बसणार मोठा दणका; वाहतूक विभागाचे कठोर कारवाईचे आदेश

Monday, 3 August 2026, 19:28

कोरेगाव मूळ येथे येथील मुळा-मुठा बंधाऱ्यावरून बिवरीतील एकजण गेला वाहून; 15 दिवसांपूर्वी ‘पुणे प्राईम न्यूज’कडून धोक्याचा व्हिडिओ प्रसारित, तर आज दुर्घटना, प्रशासनाचा अद्याप पत्ता नाही..

Monday, 3 August 2026, 19:25
Next Post

कदमवाकवस्तीत घरफोडी! उघड्या दरवाजाचा फायदा घेत चोरट्यांचा डल्ला; तब्बल ८ लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.