Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडमध्ये ‘लिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने तरुणाला 3 अज्ञात भामट्यांकडून मारहाण; मोबाईल, रोख रक्कमेसह कागदपत्रे पळवली

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 24 June 2026, 17:35

दौंड, (पुणे) : दौंड रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या एका कंपनी कामगाराला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून, एका अंधाऱ्या ठिकाणी नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत अज्ञात तीन चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे पळवली.

प्रशांत पांडुरंग हरमकार (वय 23, रा. कुरकुंभ एमआयडीसी, मूळ रा. खामगाव, जि. बुलढाणा) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात तिघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 एप्रिल 2026 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास दौंडमधील ‘गोल राऊंड’ परिसरात घडली. तर मंगळवारी (ता. 23 जूनला) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत हरमकार हा कुरकुंभ एमआयडीसीमधील कंपनीत नोकरी करतो. कंपनीतून तीन महिन्यांची सुट्टी मिळाल्याने तो गावी जाण्यासाठी निघाला होता. 13 एप्रिलला 12 वाजण्याच्या सुमारास कुरकुंभ येथून पायी चालत दौंड कॉर्डलाईन रेल्वे स्टेशनकडे निघाला होता. यावेळी पाठीमागून एका मोटारसायकलवरून दोन अज्ञात इसम आले आणि त्यांनी प्रशांतला गाठले. “तुला कुठे जायचे आहे? आम्ही तुला बस गाडीवर सोडतो,” प्रशांतने रेल्वे स्टेशनला जायचे असल्याचे सांगताच, चल तुला सोडतो,” असे म्हणून त्यांनी प्रशांतला विश्वासात घेऊन दुचाकीवर बसवले.

दोन्ही आरोपींनी एका सुनसान अंधाऱ्या ठिकाणी नेऊन गाडी थांबवली. त्या ठिकाणी आधीच एक तिसरा साथीदार दुसरी दुचाकी घेऊन दबा धरून बसला होता. प्रशांत गाडीवरून उतरताच त्या तिसऱ्याने पाठीमागून त्याचे हात पकडले. तर लिफ्ट देऊन आणलेल्या एकाने थेट जमिनीवरील मोठा दगड उचलला आणि “तुझ्याकडील पैसे आणि मोबाईल दे, नाहीतर लय मारील अशी धमकी दिली. प्रशांतने घाबरून ओरडण्याचा प्रयत्न केला असता, त्याला कानाखाली मारत पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

 

दरम्यान, चोरट्यांनी प्रशांतच्या खिशातून मोबाईल आणि पाकिटातील रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड आणि एसबीआयचे एटीएम कार्ड जबरदस्तीने काढून घेतले. लूटमार केल्यानंतर तिन्ही चोरटे त्यांच्या दोन मोटारसायकलवरून पसार झाले. तो तशाच अवस्थेत पायी चालत रेल्वे स्टेशनवर गेला आणि तेथून थेट बुलढाणा येथील आपल्या मूळ गावी निघून गेला.

दरम्यान, सुट्टी संपवून तो पुन्हा कुरकुंभ येथील कंपनीत कामावर हजर झाला, त्यानंतर त्याने मंगळवारी रात्री दौंड पोलीस ठाणे गाठून ही तक्रार दिली आहे. तपास पोलीस हवालदार आसिफ सय्यद करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02
Next Post

Loni kalbhor News : विधवा महिलेच्या घरात चोरी; दीड लाखांचा ऐवज लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp