लोणीकंद : स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित केले जावे. अशी मागणी लोणीकंद येथील भाजप सांस्कृतिक आघाडीचे उपाध्यक्ष योगीराज शिंदे यांनी केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पद्म पुरस्कारासाठीची शिफारस क्रीडा मंत्रालयाकडून केली जावी. ही समस्त कुस्ती विश्वाची इच्छा असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार बाळा भेगडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, प्रिया बेर्डे, जयश्री पलांडे, दादासाहेब सातव, संदीप भोंडवे, रविंद्र कंद यांच्या मार्गदर्शनाखाली योगीराज शिंदे काम करतात.